विदर्भाच्या लढय़ासाठी समन्वय समिती

0
12

नागपूर दि.१५:: स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी पुन्हा एकदा सर्वपक्षीय विदर्भवादी नेत्यांनी एकत्र येऊन लढण्याचा संकल्प केला आहे. विदर्भाच्या लढय़ाची रूपरेषा ठरविण्यात येणार असून त्यासाठी एक समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे.
गुरुवारी रामदासपेठ येथील एका हॉटेलात दुपारी ही बैठक पार पडली. या बैठकीत ज्येष्ठ विदर्भवादी नेते माजी खा. दत्ता मेघे, माजी मंत्री रणजित देशमुख, महाराष्ट्राचे महाधिवक्ता अँड. श्रीहरी अणे, माजी मंत्री मधुकरराव किंमतकर, आ. आशिष देशमुख, आमदार समीर मेघे, आमदार पंकज भोयर, आ. चरण वाघमारे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उमेश चौबे, अँड. अनिल किलोर, चंद्रकांत वानखेडे, प्रा. शरद पाटील, मोहन गायकवाड, अँड. मुकेश सर्मथ, देवेंद्र पारेख, प्रकाश इटनकर,हरीश इथापे, अरुण बोंदे, प्रमोद पांडे, नितीन रोंघे, अँड. नीरज खांदेवाले, अँड. संदेश सिंगलकर, अमिताभ पावडे, अँड. दीपक पाटील, धनंजय मिश्रा, जुगल कोठारी आदींसह विदर्भातून जवळपास ७0 ते ७५ लोक उपस्थित होते.
ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांच्या नेतृत्वात ही बैठक झाली. या बैठकीत स्वतंत्र विदर्भाच्या आंदोलनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.