दूध निर्मितीसाठी अद्ययावत तंत्रज्ञान अवगत करा-जिल्हाधिकारी धीरजकुमार

0
13

भंडारा  दि.१५: जिल्हा दूध संघाच्या दूध टँकरद्वारे मदर डेअरी वाशी (मुंबई) येथे पोहचते केले जाते. ही बाब भंडारा जिल्हा दूध संघाकरिता गौरवास्पद आहे. अद्यावत व तंत्रज्ञान अवगत करून दुधाची निर्मिती करण्याकरिता जनावरांची काळजी घेतली पाहिजे. सकस आहार दिला पाहिजे, तरच दुधाचे संकलनात वाढ होवू शकेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केले.
जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघाद्वारे राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड अंतर्गत एनडीपी १ व्हीबीएमपीएस कार्यक्रम अनुसूचित जाती / जमाती व इतर दूध उत्पादक शेतकर्‍यांकरिता मंगलम सभागृह भंडारा येथे घेण्यात आला. त्याप्रसंगी उदघाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघाचे अध्यक्ष विलास काटेखाये होते. उद््घाटन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांच्या हस्ते करण्यात आले. अतिथी म्हणून राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड मुंबई क्षेत्रीय प्रमुख एम.एन. बुच, वरिष्ठ व्यवस्थापक, अनिल हातेकर, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त डी.एन. धारगावे, पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक उपायुक्त भूमेश्‍वर बोरकर, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी नलिनी भोयर, नाबार्डचे महाव्यवस्थापक अरविंद खापर्डे, जिल्हा उद्योग अधिकारी करमाडे, पशुधन विकास अधिकारी डॉ.किंदर्ले, जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी प्रदीप पात्रे व दुग्ध संघसघाचे संचालक मंडळ उपस्थित होते. डी.एन. धारगावे यांनी अनुसूचित जाती / जमातीच्या लाभार्थिंना केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती सांगून त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.विलास काटेखाये यांनी दूध उत्पादकांनी जास्तीत जास्त दुधाचा व्यवसाय करावा, स्वच्छ, निर्मळ व उच्च गुणवत्तेच्या दुधाची निर्मिती करून संघाला दूध पुरवठा करावा, असे आवाहन केले. प्रास्ताविक व संचालन संघाचे कार्यकारी संचालक करण रामटेके यांनी केले. जिल्ह्यातील दूध उत्पादक मोठय़ा प्रमाणावर उपस्थित होते