रामाटोला येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते नवतेजस्विनी दुग्ध शीतकरण केंद्राचे भूमीपूजन

0
23

गोंदिया,दि.2 : जिल्हाधिकारी कार्यालय द्वारा नियोजन विभाग गोंदिया सहाय्यीत महिला आर्थिक विकास महामंडळ गोंदिया आणि अदानी फाऊंडेशन तिरोडा द्वारे संचालित जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेअंतर्गत सूक्ष्म प्रकल्प योजनेअंतर्गत मंजूर नवतेजस्विनी दुग्ध शीतकरण केंद्र रामाटोला (काचेवानी) येथे पालकमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले.

        यावेळी जिल्हाधिकारी नयना गुंडे, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड, जिल्हा नियोजन अधिकारी कावेरी नाखले, उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी संजय संगेकर उपस्थित होते.

        पालकमंत्री श्री तनपुरे यांनी यावेळी तिरोडा व गोंदिया येथील दुग्ध संकलनाच्या विकासावर सर्वांगीण विकासाची संकल्पना मांडून सर्व प्रकारच्या मदतीचे आश्वासन दिले. तसेच तिरोडा व गोंदिया येथील दुग्ध संकलनाच्या विकासावर भर देवून पशुधन वाढविण्याकरीता शासकीय योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

        कार्यक्रमाचे प्रास्तविक माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी संजय संगेकर यांनी केले. उपस्थितांचे आभार सहाय्यक सनियंत्रण अधिकारी प्रदिप कुकडकर यांनी मानले. संचालन प्रभाग समन्वयक सारिका बन्सोड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी सतीश मार्कंड, योगेश वैरागडे, राम सोनवणे, हेमंत मेश्राम, तृप्ती चावरे, शिल्पा येडे, अनिता आदमने, मुन्ना बिसेन, नामदेव बांगरे, संदिप राणे, भुपेश हरिणखेडे, तिरोडा तालुक्यातील सर्व लोकसंचालित साधन केंद्राचे व्यवस्थापक, सहयोगिनी, लेखापाल यांनी सहकार्य केले.