व्यसनमुक्तीचा संदेश राज्यभर पोहोचविण्यासाठी संमेलन उपयुक्त ठरणार – पालकमंत्री बडोले

0
10

गोंदिया, दि.१७ : व्यसनाधिनतेमुळे कुटूंबासोबत समाजाचे स्वास्थ बिघडते. पर्यायी राज्याचे नुकसान होते. समाजातील विविध घटकातील युवकांना एक जबाबदार नागरिक घडविण्यासाठी तो आधी व्यसनुमक्त होणे गरजेचे आहे. थोर साधू-संत व महापुरुषांचा व्यसनमुक्तीचा संदेश या साहित्य संमेलनातून राज्यभर जाण्यास मदत होईल. असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आज (ता.१७) गोंदिया येथे २२ व २३ जानेवारी रोजी होणाऱ्या देशातील ४ थ्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती संमेलनाच्या पूर्व तयारीचा आढावा घेतांना पालकमंत्री बडोले बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त माधव झोड, महाराष्ट्र नशाबंदी मंडळाच्या वर्षा विलास, अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते यांची मंचावर उपस्थिती होती.
पालकमंत्री बडोले म्हणाले, जिल्हयातील सर्व शाळा, महाविद्यालये, विविध सामाजिक संघटना, महिला बचतगट, डद्योग प्रतिष्ठाने, व्यापारी बांधव, शासनाच्या सर्व यंत्रणा यांनी या संमेलनात उपस्थिती दर्शवून व्यसनमुक्तीचा संदेश घरोघरी पोहचवावा. या संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी व तालुका पातळीवर तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन समित्या गठीत कराव्यात.
गोंदिया जिल्हा व्यसनमुक्त व्हावा यासाठी या संमेलनाच्या माध्यमातून लोकचळवळ उभी राहण्यास मदत होईल असे सांगून श्री बडोले म्हणाले, एक आदर्श व्यसनुक्त साहित्य संमेलनाच्या आयोजनात स्थानिक कवी, साहित्यीक यांचा सहभाग राहणार असून हे संमेलन अत्यंत नियोजनबध्द पध्दतीने होणार असल्याचे ते म्हणाले.
जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी म्हणाले, जिल्हयाच्या दृष्टीने पालकमंत्री बडोले साहेबांच्या पुढाकारातून राज्यातील एक महत्वपूर्ण व मोठा कार्यक्रम गोंदिया येथे आयोजित करण्यात येणार आहे. व्यसनमुक्त समाज निर्मिती ही काळाची गरज आहे. शासकीय यंत्रणेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये व्यसनानिधनतेचे प्रमाण मोठे आहे. जिल्हयात गुळाखू, खर्रा व दारुचे प्रमाण युवक व नागरिकांमध्ये मोठे आहे. महिलासुध्दा गुडाखू, तंबाखू खात असल्याचे चित्र आहे.
व्यसनमुक्तीच्या या राज्यस्तरीय कार्यक्रमात जिल्हयातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे. असे आवाहन डॉ. सूर्यवंशी पूढे म्हणाले, शाळा-महाविद्यालयातील युवकांनी मोठ्या संख्येने दोन दिवसीय राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाला उपस्थित राहून व्यसनमुक्तीचा संदेश सर्व समाजापर्यंत पोहचवावा. या संमेलनाचे नियोजनबध्द व यशस्वी आयोजन करुन राज्यात जिल्हयाची चांगली प्रतिमा निर्माण करावी. असेही ते म्हणाले.  झोड म्हणाले, व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी या संमेलनातून लोक चळवळीचे स्वरुप प्राप्त होणार आहे. दोन दिवशीय कार्यक्रमातून व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी वातावरण निर्मिती होईल. या प्रदर्शनातील विविध स्टॉलच्या माध्यमातून थोर संताचे, समाजसुधारकांचे साहित्य व्यसनमुक्तीसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. महाराष्ट्र नशाबंदी मंडळाने या व्यसनमुक्ती संमेलनाची रुपरेषा तयार करण्यासाठी मदत केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी महाराष्ट्र नशाबंदी मंडळाच्या वर्षा विलास यांनीही मार्गदर्शन केले.

व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाच्या पूर्व तयारी बैठकीला जिल्हास्तरीय विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी, पोलिस विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, तालुकास्तरीय यंत्रणांचे अधिकारी, जिल्हयातील विविध शाळा-महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राचार्य, व्यसनमुक्तीच्या चळवळीत काम करणारे जिल्हयातील सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.