साहित्य संपन्न जीवन जगण्यासाठी युवकांनी व्यसनाधिनता टाळावी- डॉ. सुभाष खंडारे

0
15

डॉ. आंबेडकरांचे व्यसनमुक्ती संदर्भातील विचार

गोंदिया, दि. २3 : प्रचंड विद्वत्ता व उत्कृष्ट व्यक्तिमत्व आहे म्हणून तूम्ही खूप चांगले आहात असे नाही तर एक परिपूर्ण व्यक्ती होण्यासाठी चारित्र्यसंपन्न असणे महत्वाचे आहे. परंतू व्यसनाधिनतेमुळे लाचार झालेला व्यक्ती स्वत:च्या अध:पतनाला स्वत:च जबाबदार असतो. म्हणून यूवकांनो चारित्र्यसंपन्न जीवन जगण्यासाठी व्यसन करणे टाळा. असा मौलिक सल्ला प्रा. डॉ. सुभाष खंडारे यांनी तरुणांना व व्यसनाधिन झालेल्या व्यक्तींना दिला. सामाजिक न्याय व‍ विशेष सहाय्य विभागाच्या वतीने आयोजित दोन दिवसीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनात ते बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त त्यांचे व्यसनमुक्ती संदर्भातील विचार या विषयावर त्यांनी उपिस्थतांना मार्गदर्शन केले. यावेळी ते बोलत होते.
डॉ. बाबासाहेबांच्या हिंदी, इंग्रजी व पाली साहित्याचा अभ्यास केल्यास बाबासाहेबांचे व्यसनमुक्तीवरचे कार्य आपल्या लक्षात येते. गुन्हेगारी, लाचारी व मनूष्याचे अध:पतन घडवून आणणारी कोणतीही क्रिया म्हणजे व्यसन होय हे आंबेडकरांनी त्यांच्या साहित्य व कृतीतून व्यक्त केले. कुटूंबातील व्यक्तीच्या व्यसनाधिनतेमुळे स्त्री वर्गाला होणारा त्रास, अपमान याबाबत त्यांनी तळमळ व्यक्त केली. म्हणूनच स्त्री जीवनाचा पाया भक्कम करण्याचे कार्य त्यांनी हाती घेतले. व्यसनामुळे लाचार व्यक्तीच्या हातून गुन्हे घडतात. गुन्हयाचे गंभीर होत जाणारे स्वरुप आपण समाजात बघतोच आहे. हे व्यसनाधिनतेचेच फलित आहे. व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात समाजमन निरोगी ठेवण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मोलाचा वाटा आहे. असे खंडारे यांनी यावेळी सांगितले.

व्यसनमुक्ती साहित्य संमेलनातील दुपारच्या सत्रात ‘व्यसनाधिनतेतून मुक्त झालेल्यांचे अनुभव कथनङ्क या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये प्रसाद बेलवलकर, अरंविद वनकर, गणेश वानखेडे, भाऊराव रत्ने, पियूष ठवरे, दत्ता श्रीखंडे यांनी आपले अनुभव कथन केले. वाईट सोबतीचा परिणाम, सुरुवातीला गंमत व मजा म्हणून व्यसन करणे यामुळे होणारे शारीरीक, मानसिक, सामाजिक व आर्थिक नुकसान याबाबत त्यांनी आपल्या अनुभवातून उपस्थित युवकांना सजगतेचा इशारा दिला. व्यसनामुळे आयुष्याचे नुकसान, उध्वस्तता पैशामुळेही भरुन निघू शकत नाही या शब्दात त्यांनी आपल्यावर ओढवलेले प्रसंग कथन केले. व्यसनमुक्त होण्याच्या निर्धारातून नवीन आयूष्य जगावे याबाबत त्यांनी मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले.