शेतकरी आत्महत्येला जागतिकीकरण व व्यसनाधीनताही कारणीभूत

0
41

-परिसवांदातील सुर

 

खेमेंद्र कटरे

गोंदिया,दि.२३,शेतकरी आत्महत्येचा विषय आणि बलात्काराचा प्रश्नाकडे गांर्भीयाने कधीच लक्ष दिले नाही,त्यातच शेतकरी आत्महत्येला पूर्णपणे व्यसनाधीनताही कारणीभूत आहे असे म्हणता येत नसले तरी काही प्रमाणात आहे,हे नाकारता सुध्दा येणार नसल्याने व्यसनमुक्त समाजाशिवाय शेतकरी आत्महत्यांचा सत्र थांबू शकत नसल्याचा सुर परिसवांदात सहभागी वक्त्यांनी नोंदविला.
येथील स्वागत लॉन येथे आयोजित ४ थ्या राज्यस्तरीय व्यसनमुक्त साहित्य समेंलनातील दुसèया दिवशीच्या दुसèया सत्रातील शेतकèयांच्या आत्महत्यांना ग्रामीण भागातील व्यसनाधीनता कितपत कारणीभूत या विषयावर आधारीत चर्चासत्रात नोंदविला.चर्चासत्रामध्ये गजनान अमदाबादकर,संजय सोनटक्के,पाशा पटेल,महेश पवार,दिलीप अलोणे आदी उपस्थित होते.संचालन डॉ.प्रकाश धोटे यांनी केले.चर्चासत्रामध्ये दिलीप अलोणे यांनी सांगितले की,ग्रामीण भागातील व्यसनाधीनता शेतकरी आत्महत्येला जबाबदार मानता येईल.परंतु व्यसनाधीनता फोपावल्यामुळे शेतकरी आत्महत्या होतात हे समोरकरुन आत्महत्येच्या विषयाला बाजूला सारताही येत नाही.शेतातील पिकातून मिळणारा नफा आणि त्यावर होणार खर्चाचा ताळमेळ कुठेच बसत नाही.त्यामुळे नैराश्यातून वैफल्यग्रस्त झालेला शेतकरी सोईस्कर मार्ग म्हणून आत्महत्येचा मार्ग स्वीकारतो हे नाकारता येत नाही.शेतकरी आत्महत्येला मूळ कारण १९९० नंतर भारतात सुरू झालेली जागतिकीकरणाची सुरुवातही आहे.या जागतिकीकरणाने शेतकरी गिळकृंत करण्याची प्रकिया सुरू झाली आहे.रासायनिक खते,बी बियाणे खरेदी करण्याकडे शेतकरी आकर्षीत होऊ लागला. आणि अधिक उत्पादन घेण्याच्या स्पर्धेत गेलेला शेतकरी जेव्हा हाती उत्पादन आले तेव्हा तो मोळकळीस आला आणि खर्च झालेला पैसाही हाती आला नाही,त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाल्याचे अलोणे यांनी विचार व्यक्त केले.शेतकरी आत्महत्येला कर्जबाजारीपणासुद्धा जबाबदार असल्यााचे ते म्हणाले.शेतकरी कसा समृद्ध होईल,त्याचा मालाला भाव कसा मिळेल याचा प्रयत्न केला गेला नाही.तर यवतमाळ जिल्ह्यात दारुंबदीसाठी मोहीम राबविणारे महेश पवार यांनी आजचा तरुण वृत्तवाहिन्यावरील मद्यप्राशनला पाठबळ देणाèया जाहिरातीकडे आकर्षित झाला आहे.त्यामुळे तरुणाईत व्यसन फॅशन बनले.याला सरकारी धोरण जबाबदार असून शेतकरी आत्महत्येत वेगवेगळे कारण असले तरी व्यसनाधीनता हे सुध्दा कारण यवतमाळ जिल्ह्यातील आत्महत्यामध्ये असल्याचे पवार म्हणाले.याच चर्चासत्रात गजानन अमदाबादकर यांनी आपण जेव्हा ४००० आत्महत्याग्रस्त कुटुंबाला भेट देऊन समस्यां जाणून घेण्याचा प्रयत्न केला,तेव्हा अल्पवयीन आणि लहान मुलीसुद्धा विधवा झाल्याचे वास्तववादी चित्र बघावयास मिळाले.तेव्हा सरकार असो की समाज आत्महत्या आणि बलात्काराच्या विषयाला घेऊन गंभीर नसल्याचेच जाणवले.शेतकरी व्यसनाच्या आहारी हा शेवटी वैफल्याग्रस्तातून जातो. त्यामुळे व्यसनाधीनतेला आत्महत्येचे कारण मानणे हे सयुक्तिक होणार नाही असे मत व्यक्त केले.या परिसंवादात इतर मान्यवरांनीही विचार व्यक्त केले.