सरकारी दुकाने बंद केल्याने दारूबंदी नाहीच-आ.शोभा फडणवीस

0
19

व्यसनमुक्त साहित्य समेलनातील चर्चासत्रात प्रतिपादन

गोंदिया,दि.२३ : दारूबंदी होणे गरजेचे आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लाखो कुटुंब सावरणार आहेत. परंतु, त्याकरिता फक्त सरकारी दारूबंदीने काहीही होणार नाही. दारूबंदी चळवळीत काम करत असताना वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपूर या दारूबंदी असलेल्या जिल्ह्यांतील वास्तव जवळून बघता आले. त्या जिल्ह्यांत छुप्या पद्धतीने दारू उपलब्ध होत आहे. खèया अर्थाने दारूबंदी करावयाची असल्यास महिलांसह प्रत्येक नागरिकांनी स्वतःपासून व्यसनमुक्त होण्याचा संकल्प करणे गरजेचे आहे, असे मत आमदार शोभा फडणवीस यांनी व्यक्त केले.
सामाजिक न्याय व विशेष, सहाय्य विभाग व नशाबंदी मंंडळाच्या संयुक्त विद्यमाने देशातील चौथे राज्यस्तरीय व्यसनमुक्त साहित्य समेलन येथे आयोजित करण्यात आले आहे. समेलनाच्या दुसèया दिवशी आज(२३) ‘व्यसनाधीनता थांबविण्यात महिलांचा सहभागङ्क या विषयावर दुसèया सत्रात त्या अध्यक्ष म्हणून बोलत होत्या. चर्चासत्रात आमदार मेघा कुळकर्णी, प्रफुल्ला मोहिते, रचना गहाणे, समेलनाध्यक्ष मुक्ता पुणतांबेकर यांनी सहभाग घेतला. शोभा फडणवीस पुढे म्हणाल्या, दारू, सिगारेटला आज प्रतिष्ठा लाभली आहे. त्यामुळे आजची पिढी प्रतिष्ठा म्हणून व्यसनांच्या आहारी जात आहे. अशा प्रतिष्ठेच्या वस्तूवर बंदी आणणे गरजेचे आहे. लोकशाहीचा अर्थ फार व्यापक आहे. मात्र, आपल्याला फक्त मतदानकरण्यापुरतीच लोकशाही ठाऊक आहे. संविधानाच्या दिलेल्या अधिकारांचा वापर करून शासन, प्रशासनावर दबावगट तयार करून व्यसने आणि कुटुंब उध्वस्त करणाèया वस्तूंवर बंदी लादणे गरजेचे आहे. समाज घडविण्याकरिता माझे कर्तव्य काय? याचे मंथन प्रत्येकाने करून त्याची अमंलबजावणी स्वतःपासून करण्याची आज गरज आहे. व्यसनांमुळे आज चोरी, बलात्कार, अपघात यांच्या संख्येत वाढ झाली असून ती qचताजनक बाब आहे, असे त्या म्हणाल्या. मेधा कुळकर्णी म्हणाल्या, महिलांमध्ये व्यसनांचे वाढते प्रमाण विलक्षण आहे. चित्रपटात बघून तरुण, तरुणी व्यसनांच्या आहारी जात आहेत.मुलांपेक्षा मुली सिगारेट ओढण्याच्या प्रकारात पुढे असल्याचे नुकत्याच एका सव्र्हेक्षणातून पुढे आले. शरीर मेंटेन करण्याकरिता सिगारेट ओढत असल्याचे फॅड पुढे आले. व्यसनांचे हे प्रमाण कमी करण्यकरिता घरोघरी जनजागृती करणे गरजेचे आहे. प्रत्येक घरातील महिलांनी व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक होण्याची गरज आहे. प्रफुल्ला मोहिते म्हणाल्या, महिलांमध्ये व्यसनाधीनता वाढली. १३ ते ७४ वयाच्या महिला व्यसनांत अडकल्या. अमंली पदार्थांची उपलब्धता कमी करण्याची आवश्यकता आहे. समेलनाध्यक्ष मुक्ता पुणतांबेकर म्हणाल्या, व्यसनाधीनतेचा सर्वाधिक त्रास महिलांना सहन करावा लागलो. माणसाला व्यसन जडण्यात महिलांचा वाटा असल्याची समाजाची समजूत आहे. व्यसनाधीन पुरुषांचा त्रास कमी करण्याकरिता मैत्रिणींशी बोलून चर्चा करावी, असेही मत यावेळी मांडण्यात आले. संचालन नशाबंदी मंडळाच्या वर्षा विलास यांनी केले.