वृत्तपत्र विक्रेत्यांचे राज्य अधिवेशन कोल्हापुरात

0
12

गोंदिया : महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन येत्या २६ व २७ जानेवारी रोजी आर्यविन मल्टीपर्पज हॉल, गवत मंडई, शाहूपुरी कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आले आहे.
अधिवेशनाचे उद्घाटन राज्याचे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात येईल. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष हरिशचंद्र पवार राहतील. अतिथी म्हणून महापौर अश्विनी रामाने, सहाय्यक कामगार आयुक्त सुहास कदम, संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष सुनील पाटणकर, सरचिटणीस बालाजी पवार उपस्थित राहणार आहेत.
अधिवेशनात वृत्तपत्र विक्रेत्यांच्या विविध समस्यांवर चर्चा करून कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याबाबत शासनाचे लक्ष वेधण्यात येईल. अधिवेशनात वृत्तपत्र विक्रेत्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कार्याध्यक्ष राजेश वैद्य, राज्य उपाध्यक्ष दिनेश उके, सचिव हर्षदीप उके, अध्यक्ष प्रमोद भोयर, उपाध्यक्ष राजेश साठवणे, कोषाध्यक्ष दुर्गाप्रसाद अग्रहरी यांनी केले आहे.