ब्राम्हण समाजाचे स्नेह मिलन व परीचय सम्मेलन ७ ला

0
7

गोंदिया : समाजातील सर्व बांधवाचे आपसातील स्नेह वृद्धिंगत व्हावे तसेच विवाहयोग्य युवक-युवतींचा विवाहयोग जुळवून आणण्यासाठी ब्राम्हण समाजाचे स्नेह मिलन व परिचय सम्मेलन कार्यक्रम रविवार ७ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे.
शहरातील जैन कुशल भवन, गौशाला वार्ड येथे दुपारी १२ वाजेपासून कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सिद्धार्थ दुबे, बालाघाट तर उद्घाटक म्हणून शहर पोलिस निरीक्षक दिनेश शुक्ला राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून शैलेंद्र अवस्थी,नीलकंठ त्रिपाठी, प्रमोद मिश्रा, रायपुर , अशोक तिवारी राधेगोविंद बाजपेयी, सत्यनारायण तिवारी, कृष्णकुमार दुबे, केदारप्रसाद मिश्रा, केशवप्रसाद पाठक, रोहण पांडे,  विवेक मिश्रा, देवेश मिश्रा, विदर्भ प्रांत संयोजक, बजरंग दल प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.