कौशल्य शिक्षणातून स्वत:चा विकास करा – राजीव प्रताप रुडी

0
8

नागपूर : युवकांनी स्वत:चा विकास करण्यासाठी कौशल्यपूर्ण शिक्षण घेणे गरजेचे आहे, असे आवाहन केंद्रीय कौशल्य विकास, उद्योजकता (स्वतंत्र कार्यभार) राजीव प्रताप रुडी यांनी केले. ते युथ एम्पॉवरमेंट समिट कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी माजी खासदार बनवारीलाल पुरोहीत, महापौर प्रवीण दटके, आमदार सर्वश्री प्रा. अनिल सोले, कृष्णा खोपडे, सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, विकास कुंभारे, आशिष देशमुख, डॉ.मिलिंद माने, संजय पुराम आणि सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, स्थायी समिती सभापती रमेश सिंगारे, राणी द्विवेदी यांची उपस्थिती होती.

यावेळी मुधरा मानोडे, सौरभ गणीतकर, सफल मोहोड यांचा सत्कार करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्टार्ट अप इंडिया च्या धर्तीवर युथ एम्पॉवरमेंट समिट युवकांना कौशल्य प्रशिक्षण देत आहे, ही आनंदाची बाब असून देशाला कुशल मनुष्यबळाची गरज असल्याचे यावेळी राजीव प्रताप रुडी यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार प्रा.अनिल सोले यांनी तर सूत्रसंचालन श्वेता शेलगावकर तर आभार राणी द्विवेदी यांनी केले.