कोरची घाटावर मेटॅडोर उलटून १५ जण जखमी

0
5

कोरची, दि.१: साक्षगंधासाठी गावकऱ्यांना घेऊन जाणारा मेटॅडोर उलटल्याने १५ जण जखमी झाल्याची घटना आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास कुरखेडा-कोरची मार्गावरील डोंगरगाव फाटयाजवळ घडली.

कुरखेडा तालुक्यातील सावरगाव येथील एका मुलाचा साक्षगंध गोंदिया जिल्हयातील देवरी तालुक्यातील मोहगाव येथील एका मुलीशी आज होणार होता. त्यासाठी सावरगाव येथील मुलाचे नातेवाईक व गावकरी एका मेटॅडोरने मोहगावकडे जाण्यास निघाले होते. मेटॅडोरमध्ये ४० ते ५० जण बसले होते. कोरची घाटावर पोहचताच मेटॅडोर उलटल्याने १५ जण जखमी झाले. जखमीमध्ये महिलांचाही समावेश आहे. २-३ महिलांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून, एका महिलेचा पंजा तुटल्याचीही माहिती आहे. एका युवकाचे डोकेही फुटले. जखमींना कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.