माजी आमदार सानंदांना अटक

0
10

खामगाव दि.१ – नगरपरिषदेच्या इमारत बांधकामात थकीत अपहार प्रकरणी माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांना पोलिसांनी  रविवारी रात्री ९ वाजताच्या दरम्यान अटक केली. राजकीय षडयंत्रातून हा प्रकार झाला असल्याचे आरोप सानंदा यांनी केला आहे. २००६ ते २०११ या काळात खामगाव नगर परिषद इमारतीचे बांधकाम करण्यात आले होते. या प्रकरणात आर्किटेक्ट निवडण्यापासून ते इमारत बांधकामात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार नगरसेवक संदीप वर्मा यांनी पोलिसांकडे केली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्यामुळे वर्मा यांनी न्यायालयाकडे धाव घेतली होती.

nagar parishan khamgone1न्यायालयाच्या आदेशानुसार खामगाव शहर पोलिसांनी माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, नगराध्यक्ष अशोककुमार सानंदा, माजी नगराध्यक्षा सरस्वतीबाई खासणे यांच्यासह ४०३, ५०६, ४०८, ४०९, ४१७, ४१८, ४६५, ४६६, ४६७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. इमारत बांधकामाच्या खर्चावर लेखा परीक्षणातही आक्षेप नोंदविण्यात आले होते. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलीपकुमार सानंदा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात दिलेला आदेश गोंधळ निर्माण करणारा होता. आपल्या अटकेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याचा दावा सानंदा यांनी केला होता.