कुष्ठरोग निवारण मोहिमेचे उदघाटन

0
10

 

13 फेब्रुवारी पर्यंत कुष्ठरोग जनजागृतीपर कार्यक्रम

    गोंदिया,दि.1 :  राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमाअंतर्गत 30 जानेवारीला महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त तालुका कुष्ठरोग निवारण मोहिमेचे उदघाटन जि.प.अध्यक्ष उषाताई मेंढे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, जि.प.शिक्षण व आरोग्य सभापती पी.जी.कटरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.र‍वि धकाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हरिष कळमकर उपस्थित होते. या मोहिमेअंतर्गत 13 फेब्रुवारी पर्यंत आरोग्य शिक्षणविषयी जनजागृती करण्यात येणार असून स्थानिक बस स्थानक, महिला बचत गट, शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आरोग्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आरोग्य कर्मचारी व आशा कार्यकर्त्या प्रत्यक्ष गृहभेटी देऊन कुष्ठरोगाबाबत सर्वेक्षण करतील. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सांख्यिकी सहायक यु.एस.राठोड यांनी केले. यावेळी अलर्ट इंडियाचे डॉ.जे.आर.राऊत, आरोग्य सेवा कुष्ठरोगच्या सहायक संचालक डॉ.सीमा यादव, कुष्ठरोग कार्यालयाचे कर्मचारी व जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.