कोषागार कार्यालयात कोषागार दिन साजरा

0
41

 

गोदिया दि.०१- आज १ फेब्रुवारी रोजी कोषागार कार्यालय गोंदिया येथे कोषगार दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन कोषागार अधिकारी दिंगबर नेमाडे यांनी कोषागार दिनाची पार्श्वभूमी सांगून या दिवसाचे महत्व विषद केले. प्रमुख अतिथी म्हणून अप्पर कोषागार अधिकारी पी.डी.पारधी, लेखा अधिकारी श्री.बाविस्कर, श्री.रामेलवार व सहाय्यक लेखा अधिकारी श्री.कुलदिप गडलिंग उपस्थित होते.
या दिनानिमित्त उपकोषागार अधिकारी ए.यु.हुमने यांनी माहितीचा अधिकार या विषयावर, अप्पर कोषागार अधिकारी पी.डी.पारधी यांनी स्वच्छ भारत अभियान या विषयावर मार्गदर्शन केले. लेखा अधिकारी श्री.रामेलवार, श्री.बाविस्कर, सहाय्यक लेखा अधिकारी श्री.कुलदिप गडलींग, यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या निमित्ताने रांगोळी स्पर्धा, चमचा गोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाला कोषागार कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन उपलेखापाल ओ.जे.उईके यांनी केले. आभार मंजुशा ब्राम्हणकर यांनी मानले.