रेल्वेने कटून मायलेकीचा मृत्यू

0
11
सालेकसा(जि.गोंदिया), दि. १ : धावत्या रेल्वेने कटून दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना सोमवारी ( १) दुपारी दोन वाजताच्या सुमारास सोनारटोला- बोदलबोडी गावाच्या मधोमध घडली. यातील मृत दोन्ही महिलां या माय लेकी असल्याची चर्चा होती.
पोल क्रमाक ९६५/ अपलाइन क्रमांक २३२५ येथून दोन्ही महिला रेल्वे रूळ ओलांडत होत्या. यादरम्यान, गोंदियाकडे जाणाèया पुरी- अजमेर रेल्वेगाडीखाली त्या सापडल्या. त्यातच त्यांचा कटून मृत्यू झाला. सालेकसा येथे आज, सोमवारी आठवडी बाजार भरत असल्याने या बाजाराकरिता आल्या असाव्यात, असा संशय आहे.