१4 विद्यार्थी मनोहरभाई पटेल स्वर्ण पदकाचे मानकरी 

0
10
९ फेब्रुवारीला स्व.मनोहरभाई पटेल जयंती उत्सवात होणार सत्कार
चित्रपट अभिनेता सलमाख खान विशेष अतिथी!
गोंदिया दि.1: पुर्व विदर्भातील शिक्षण महर्षी तथा स्वनामधन्य नेता स्व.मनोहरभाई पटेल यांची ११० वी जयंती ९ पेâब्रुवारीला मनोहरभाई पटेल अभियांत्रीका महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात दिमाखात साजरी होणार आहे. या जयंतीच्या पावनपर्वावर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील शालांत तथा स्नातक परीक्षांमध्ये सर्वाधिक गुण प्राप्त करणार्या गुणवंत विद्याथ्र्यांना स्व.मनोहरभाई पटेल स्मृती स्वर्णपदक बहाल करून त्यांचा गौरव केला जाणार आहे. दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या या मनोहरभाई पटेल जयंती उत्सवानिमित्त स्वर्णपदक वितरण समारोहाला देशातील नामांकीत व्यक्तींची उपस्थिती राहणार आहे.
यावर्षी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील १4 विद्याथ्र्यांची स्वर्णपदकासाठी निवड करण्यात आली आहे. या विद्याथ्र्यांना स्वर्णपदक आणि सन्मानपत्र देऊन त्यांचा गुणगौरव केला जाणार आहे. एसएससी परीक्षेत प्रथम स्थान पटकवणारी गुजराती नॅशनल हायस्वूâलची विद्यार्थीनी कु.भाग्यश्री लालदास रंभाडे, गोंदिया जिल्ह्यात एसएससी परीक्षेत प्रथम स्थान पटकवणारी आदर्श विद्यालय आमगावची विद्यार्थीनी वैष्णवी अशोक शेंडे, एचएससी परीक्षेत प्रथमस्थान पटकवणारी शांताबेन मनोहरभाई पटेल कनिष्ठ महाविद्यालय गोंदियाची विद्यार्थीनी समृद्धी अंकुश मेश्राम, गोंदिया जिल्ह्यात एचएससी परीक्षेत प्रथमस्थान पटकवणारी तेजश्री रेवाराम बालपांडे, गोंदिया जिल्ह्यात बी.ए.श्रेणी प्रथम क्रमांकाने पास होणारी एस.एस.गल्र्स कॉलेजची विद्यार्थीनी प्रियंका अशोककुमार अग्रवाल, बी.कॉम. श्रेणीत प्रथमस्थान पटकवणारी एनएमडी कॉलेजची विद्यार्थीनी श्रद्धा गोपाल यादव, गोंदिया जिल्ह्यात बीएससी परीक्षेत प्रथमस्थान पटकवणारा इंदिराबेन हरीहरभाई पटेल विज्ञान कॉलेज गोरेगावचा विद्यार्थी मायकल राजेंद्र सिंहारे, गोंदिया जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने बीई परीक्षा पास करणारी कु.रिषी सुरेंद्रसिंह सलुजा, भंडारा जिल्ह्यात एसएससी परीक्षेत प्रथमस्थान पटकवणारी नुतन कन्या शाळेची विद्यार्थीनी श्रेता अरविंद साठवणे, भंडारा जिल्ह्यात एचएससी परीक्षेत प्रथम येणारी एन.पी.गांधी कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थीनी स्नेहल राजेंद्र रामटेके, भंडारा जिल्ह्यात बीएमध्ये प्रथम स्थान पटकवणारी जे.एम.पटेल कॉलेज भंडार्याची विद्यार्थीनी रुपाली शामसुंदर शेंडे, बी.कॉम. परीक्षेत भंडारा जिल्ह्यातून प्रथम येणारा जे.एम.पटेल कॉलेजचा विद्यार्थी सचिन योगराज तावडे, बी.एस.सी परीक्षेत प्रथम येणारी जीडी सराफा सायन्स कॉलेजची विद्यार्थीनी कु.बॉबी अजुम बजलु खांडेकर, भंडारा जिल्ह्यातून बी.ई.परीक्षा प्रथम स्थानात पटकावणारी एम.आय.ई.टी. शहापूरची विद्यार्थीनी प्रियंका रामकुमार जायस्वाल आदिंचा समावेश आहे.
 स्वर्णपदक वितरण समारोहाला भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन गुजराती राष्ट्रीय केलवणी मंडळ, स्व.मनोहरभाई पटेल स्मृती समितीचे अध्यक्ष हरिहरभाई पटेल तथा मनोहरभाई पटेल अ‍ॅकेडमीचे सचिव आ.राजेंद्र जैन यांनी केले आहे.