बिरसी विमानतळावरील सुरक्षारक्षकांचे आंदोलन सुरू

0
7

महेश येळे

रावणवाडी-गोंदिया,दि.१ : बिरसी विमानतळ प्रशासनातील अधिकाèयांच्या जाचाला कंटाळून सुरक्षारक्षकांनी कारवाईसाठी थेट उपोषणाचे हत्यार उपसले.  आज सोमवारपासून ( १) विमानतळाच्या  प्रवेशद्वारासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. पहिल्या दिवशी पाच सुरक्षारक्षक उपोषणावर बसले आहेत. गेल्या आठ दहा वर्षापासून हे सुरक्षारक्षक कार्यरत आहेत.परंतु  एअरपोर्ट निदेशक एस. एस. प्रजापती व मुख्य सुरक्षा अधिकारी शिवचरण मीना हे कोणतेही कारण नसताना मानसिक त्रास देत आहेत. याबाबतच्या अनेक तक्रारी सुरक्षा रक्षकांनी वरिष्ठांनाही केल्या. मात्र वरिष्ठ उलट कामावरून काढण्याची धमकी देतात. अधिकाèयांच्या तक्रारी केल्यात म्हणून पंकज वंजारी, झुन्नसिग बरेले व नंदकिशोर नागपुरे या तिघांना निलंबित केले. यास विरोध करीत सुरक्षा रक्षकांनी विविध मागण्यांसाठी उपोषणाचा मार्ग पत्कारला आहे.