ओबीसींनो अधिकारासाठी पेटून उठा-इंजि.प्रदीप ढोबळे

0
7

गोंदिया: संविधानाने दिलेल्या अधिकाराचे संरक्षण करणे जेवढे आपले कार्य आहे. तेवढेच आपल्या अधिकारासाठी जागृत राहून पेटण्याचीही गरज आहे. आज आपल्या अधिकारावर काही तत्त्वांनी घाला घालून आपले अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी आरक्षण विरोधी मोहीम उघडली आहे. या मोहिमेला उत्तर देण्यासाठी संगठीत होऊन पुरेशा प्रतिनिधित्वासाठी संविधानात असलेली आरक्षणाची तरतूद पूर्णपणे लागू करण्यात यावी असे विचार ओबीसी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष इंजि. प्रदीप ढोबळे यांनी व्यक्त केले. ते आमगाव येथील डोयेवाडा येथे आयोजित गोंदिया जिल्हा स्तरीय ओबीसी सेवा संघाच्या अधिवेशनात अध्यक्षस्थानावरून बोलत होते. जिल्हा अधिवेशनाचे उद्घाटन आदिवासी सेवक डॉ. एन.डी. किरसान यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागताध्यक्ष डॉ. शशांक डोये, प्रा.डी.एस. मेश्राम, प्रा. महेंद्र धावडे, जिल्हाध्यक्ष डी.एम. करमकर, लाखनीचे डॉ. अमित गायधने, सौ. सुनिता हुमे मंचावर उपस्थित होते. पाहुण्यांचे स्वागत सावित्री स्तवनाने आणि संविधान प्रास्ताविकाचे वाचन करून करण्यात आले. पुढे बोलताना ढोबळे म्हणाले की संविधानात पुरेशा प्रतिनिधित्वासाठी लोकसंख्या निहाय आरक्षणाची तरतूद आहे. ओबीसी आरक्षणाची अंमलबजावणी लोकसंख्येच्या प्रमाणात फक्त तामिलनाडू राज्यात होत आहे. कारण त्या राज्यात ओबीसी जातीचा नव्हे तर ओबीसी नीतीचा नेता कार्यरत आहे. म्हणून ओबीसींनी आपला नेता ओळखण्याची गरज असून मुखवट्यापासून सावध राहिले पाहिजे. शिक्षणातील आरक्षण कमी असेल तर नौकरीच्या आरक्षणाला काहीच अर्थ नाही. कारण शिक्षणाशिवाय नोकरीचा मार्ग मोकळा होऊ शकत नाही. महात्मा फुलेंची सामाजिक समतेची लढाई ओबीसींनी लढायची आहे. तर शेतकरी आत्महत्या म्हणजे ओबीसींची आत्महत्या आहे हे विसरून चालणार नाही. कार्यक्रमाचे उद्घाटन एन.डी. किरसान यांंनी वर्ण व्यवस्थेमुळे बळी पडलेला समाज म्हणून बळीराजा अर्थातच शेतकरी, शेतमजूर, ओबीसी वर्ग आपल्या हक्क अधिकारापासून वंचित राहिला आहे. संख्येने जास्त असला तरी संगठितपणा नसल्याने ओबीसींच्या हक्कावर उच्च वर्णियांनी कब्जा केला आहे. त्यामुळे वर्ण व्यव्थेच्या आहारी गेलेल्या ओबीसी समाजाने महापुरुषांच्या विचारांना आत्मसात करून आपल्या संघर्षासाठी रस्त्यावर येण्याची गरज आहे. सुनीता हुमे यांनी महिलांनी सावित्रीबार्इंचा आदर्श बाळगला पाहिजे. आई जागृत झाली तर तिच्या मुलांचे भविष्य उज्वल होते हे लक्षात घेण्याची गरज आहे. स्वागताध्यक्ष शशांक डोये यांनी भारत हा शेती प्रधान देश म्हटला जातो परंतु आता हा देश राजकीय पुढाèयांचा व नौकरशहांचा देश झाला आहे. गाव खेळ्यातील ओबीसी शेतकèयांनी संगठीत होऊन लढा उभारलयाशिवाय पर्याय नसल्याचे ते म्हणाले. उद्घाटन कार्यक्रामाचे प्रास्तविक जिल्हाध्यक्ष प्रा. करमकर यांनी केले. संचालन विनायक येडेवार यांनी केले. यावेळी स्मरणिका, दिनदर्शिका व सावन कटरे यांच्या एकांकिकेचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर आयोजित दुसèया सत्रात संत महापुरुषांच्या विचारांनी आपला समाज जागृत व्हायला हवा, ओबीसींचे नेतृत्व आजही राजकीय क्षेत्रात स्वीकारले जात नाही. qकवा दिले ही जात नाही त्यामुळे आपली शक्ती महापुरुषांच्या विचारांच्या आधारावर बळकट करून लढा उभारण्याची गरज असल्याचे विचार प्रा. महेंद्र धावडे यांनी व्यक्त केले. यावेळी प्रा.डी.एस.मेश्राम यांनी समाजाला संगठीत होण्याची गरज असल्याचे विचार व्यक्त केले. तर सविता बेदरकर यांनी महिलांनी खरी जागृती निर्माण करून आपल्या घरातून परिवर्तनाची चळवळ सुरू केली पाहिजे. महिला संगठीत झाल्या तर ओबीसींचे अधिकार कुणीही हिरावून घेणार नाही असे सांगितले. प्रा.प्रकाश धोटे यांनी नौकरीतील ओबीसी आरक्षणाच्या रोस्टरची माहिती देत ओबीसींवर कसा अन्याय केला जातो याची सविस्तर माहिती दिली. या सत्राचे अध्यक्ष बबलू कटरे यांनी आता गप्प बसून चालणार नाही तर गावा-गावात जाऊन जनचेतना करावी लागणार आहे. आपण ज्या राजकीय पक्षात काम करतो तिथे काय होणार ही भिती मनात न बाळगता आपण आधी ओबीसी आहोत आणि समाजासाठी आपल्याला काही करायचे आहे हे मनाशी गाठ बांधून आपणास संघटनेला बळकट करावयाची गरज असल्याचे विचार व्यक्त केले. संचालन पी.डी. चव्हाण व आभार नितीन राऊत यांनी मानले. आयोजनासाठी गोंदिया जिल्हा ओबीसी सेवा संघ व ओबीसी संघर्ष कृती समितीच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले.