कार्य.अभियंता श्रीमती चव्हाण यांची तडकाफडकी बदली

0
16

एकीकडे समता वर्ष,दुसरीकडे महिला अधिकाèयांशी विषमतेची वागणूक
श्रीमती चव्हाणांच्या विरोधात मंत्रालयापर्यंत पोचणारे ते दोन कंत्राटदार कोण
खेमेंद्र कटरे
गोंदिया,दि.४-भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र सरकार असो की केंद्र सरकार अनुसूचित जातीतील नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न सामाजिक न्याय विभाग समता वर्षाच्या माध्यमातून करीत आहे.ज्या समाजातून बाबासाहेब पुढे आले त्या समाजातल्या तळागळातल्या प्रत्येकाला न्याय देण्यासाठी हे वर्ष समता वर्ष साजरा करण्यात येत असतानाच एका उच्च पदावरील महिला अधिकाèयाला मात्र तडकाफडकी जिल्ह्यातील कुठल्याही जनतेकडून विरोध नसताना तक्रारी नसताना बदलविले जात असेल तर कसले हे समता वर्ष म्हणण्याची वेळ आली आहे.सविस्तर असे की,गेल्या सात आठ महिन्यापूर्वी गोंदियाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग(रोहयो)च्या कार्यकारी अभियंता म्हणून श्रीमती सोनाली चव्हाण यांची बदली करण्यात आली.श्रीमती चव्हाण रुजू झाल्या.आणि त्यांनी आपल्या कामकाजास सुरवात करीत शहरातील अनेक संथगतीने सुरू असलेल्या कामांना गती देण्याचा प्रयत्न केल्याचे नेहमी त्या कामाच्या स्थळी त्यांच्या उपस्थितीवरून दिसून यायचे.परंतु अचानक त्यांची बदली करण्यात आली.विशेष म्हणजे श्रीमती चव्हाण या जिल्हा सत्र न्यायालय परिसरात नव्याने तयार करण्यात आलेल्या वैकल्पिक वाद निवारण केंद्राच्या इमारतीचे उदघाटन समारंभ आटोपून आपल्या गावी जाण्यासाठी निघाल्या.तर त्याचवेळी त्यांच्या जागेवर गोंदिया येथीलच बांधकाम विभागात कार्यरत असलेले उपविभागीय अभियंता श्री नंदनवार यांना पदोन्नती देत त्यांना तत्काळ एकतर्फी त्याठिकाणी रुजू होण्याचे आदेश देण्यात आले.त्यातही नंदनवार यांचे हे आदेश गोंदियातील दोन कंत्राटदारानी मुंबईवरून स्वत विमानाने आणल्याची चर्चा आहे.तसे त्या कंत्राटदारांनी येथील काहींना भ्रमणध्वनी करून निरोप दिला की नंदनवार यांना कार्यालयातच थांबवा त्यांना रात्रीलाच कार्यकारी अभियंता पदाचा प्रभार स्विकारयाचा आहे.एकीकडे राज्यसरकार व केंद्रसरकार सरकारी नोकरीसह खासगी नोकरीतही महिलांना सुरक्षा मिळाली पाहिजे त्यांच्या काम करण्याच्या ठिकाणी त्यांच्यावर अन्याय होऊ नये याबद्दल मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करीत असतानाच गोंदियात मात्र कार्यकारी अभियंता असलेल्या एका महिला अधिकाèयांच्या जागेवर दुसèया व्यक्तीची नियुक्ती कुठलेही कारण नसताना तत्काळ दिल्याने महिला वर्गात एक चर्चेचा विषय बनला आहे.यात श्रीमती चव्हाण यांना येथून एकाबाजून कार्यमुक्त करतांनाच त्यांची दुसèया ठिकाणी मात्र वृत्तलिहिपर्यंत पदस्थापना करण्यात आलेली नव्हती.