राष्ट्रपतीकडे मागितली इच्छामरणाची मागणी

0
9

भंडारा,दि.7 : मागील १0 वर्षापासून प्राथमिक आरोग्य केंद्रात कंत्राटी वाहन चालक म्हणून २४ तास सेवा देत असून शासन स्तरावर आमच्या मागण्याकडे सतत सरकार दुर्लक्ष करीत आहे व आमच्या पदरी निराशाच पडत असल्याने शेवटी कंटाळून कंत्राटी वाहन चालक जितेंद्र डोंगरे यांनी इच्छामरणासाठी राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्याकडे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत विनंती केली आहे.
सदर कंत्राटी वाहन चालक हा भंडारा जिल्ह्यातील व मोहाडी तालुक्यातील मोहगाव (देवी) येथील रहिवासी असून ते सन २00६ पासून प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कंत्राटी वाहन चालक व रोजंदारी तत्वावर कार्यरत आहे.
सदर वाहनचालकाची नियुक्ती प्राथमिक आरोग्य केंद्र दिघोरी (मोठी) येथे करण्यात आली.तेव्हा त्यांना फक्त २६५0 रुपये एवढ्याशा मानधनावर २४ तास सेवा देणे बंधनकारक होते. तरीसुद्धा सदर वाहन चालक मुकाट्याने २४ तास सेवा देत होते.सन २00७ मध्ये डोंगरे यांची बदली प्राथमिक आरोग्य केंद्र पहेला येथे करण्यात आली.