आज स्वर्णपदक वितरण समारोह

0
8
गोंदिया : गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील स्वनामधन्य नेता शिक्षण महर्षी स्व.मनोहरभाई पटेल यांची ११० व्या जयंती समारोहानिमित्त आज (दि.९) चित्रपट अभिनेता सलमान खानच्या हस्ते गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील प्राविण्यप्राप्त विद्याथ्र्यांना स्वर्णपदक प्रदान करून सन्मानित केले जाणार आहे. स्वर्णपदक वितरण समारोह मनोहरभाई पटेल अभियांत्रीकी महाविद्यालय कुडवा (गोंदिया) च्या प्रांगणात आज दुपारी १२.३० वाजता आयोजित करण्यात आले आहे. अध्यक्षस्थानी खा.प्रपुâल              पटेल राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून इंडिया टीव्हीचे प्रबंध संचालक रजत शर्मा, मीडीया गुरू सुहेल सेट, माजी मंत्री अनिल देशमुख, आ.गोपालदास अग्रवाल, माजी राज्यमंत्री बंडू सावरबांधे, माजी राज्यमंत्री विलास शृंगारपवार, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, माजी आ.अनिल बावनकर, रामनतन राऊत, दिलीप बन्सोड, सेवक वाघाये, मनोहरभाई            पटेल अ‍ॅकेडमीच्या अध्यक्षा वर्षा पटेल आणि मधुकर कुकडे यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील गुजराती राष्ट्रीय केलवणी मंडळ, स्व.मनोहरभाई पटेल स्मृती समिती तथा मनोहरभाई पटेल अ‍ॅकेडमीतर्पेâ आयोजित करण्यात आलेल्या स्वर्णपदक वितरण समारोहात भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण होणाNया गुणवंत विद्याथ्र्यांना स्व.मनोहरभाई पटेल स्मृती स्वर्णपदक व स्मृतिचिन्ह प्रदान करून सन्मानित केले जाणार आहे. सत्कारमूर्ती विद्याथ्र्यांमध्ये एसएससी परीक्षेत प्रथम स्थान पटकवणारी गुजराती नॅशनल हायस्वूâलची विद्यार्थीनी कु.भाग्यश्री लालदास रंभाडे, गोंदिया जिल्ह्यात एसएससी परीक्षेत प्रथम स्थान पटकवणारी आदर्श विद्यालय आमगावची विद्यार्थीनी वैष्णवी अशोक शेंडे, एचएससी परीक्षेत प्रथमस्थान पटकवणारी शांताबेन मनोहरभाई पटेल कनिष्ठ महाविद्यालय गोंदियाची विद्यार्थीनी समृद्धी अंकुश मेश्राम, गोंदिया जिल्ह्यात एचएससी परीक्षेत प्रथमस्थान पटकवणारी तेजश्री रेवाराम बालपांडे, गोंदिया जिल्ह्यात बी.ए.श्रेणी प्रथम            क्रमांकाने पास होणारी एस.एस.गल्र्स कॉलेजची विद्यार्थीनी प्रियंका अशोककुमार अग्रवाल, बी.कॉम. श्रेणीत प्रथमस्थान पटकवणारी एनएमडी कॉलेजची विद्यार्थीनी श्रद्धा गोपाल यादव, गोंदिया जिल्ह्यात बीएससी परीक्षेत प्रथमस्थान पटकवणारा इंदिराबेन हरीहरभाई पटेल विज्ञान कॉलेज गोरेगावचा विद्यार्थी मायकल राजेंद्र                 सिंहारे, गोंदिया जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने बीई परीक्षा पास करणारी कु.रिषी सुरेंद्रसिंह सलुजा, भंडारा जिल्ह्यात एसएससी परीक्षेत प्रथमस्थान पटकवणारी नुतन कन्या शाळेची विद्यार्थीनी श्रेता अरविंद साठवणे, भंडारा जिल्ह्यात एचएससी परीक्षेत प्रथम येणारी एन.पी.गांधी कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थीनी स्नेहल राजेंद्र रामटेके, भंडारा जिल्ह्यात बीएमध्ये प्रथम स्थान पटकवणारी जे.एम.पटेल कॉलेज भंडाNयाची विद्यार्थीनी रुपाली शामसुंदर शेंडे, बी.कॉम. परीक्षेत भंडारा जिल्ह्यातून प्रथम येणारा जे.एम.पटेल कॉलेजचा विद्यार्थी सचिन योगराज तावडे, बी.एस.सी परीक्षेत प्रथम येणारी जीडी सराफा सायन्स कॉलेजची विद्यार्थीनी कु.बॉबी अजुम बजलु खांडेकर, भंडारा जिल्ह्यातून बी.ई.परीक्षा प्रथम स्थानात पटकावणारी एम.आय.ई.टी. शहापूरची विद्यार्थीनी प्रियंका रामकुमार जायस्वाल आदिंचा समावेश आहे. स्वर्णपदक वितरण समारोहाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मनोहरभाई पटेल स्मृती समिती गुजरात राष्ट्रीय केलवणी मंडळातर्पेâ हरिहरभाई पटेल आणि मनोहरभाई पटेल अ‍ॅकेडमी तर्पेâ गोंदिया शिक्षण संस्थेचे सचिव आ.राजेंद्र जैन यांनी केले आहे.