सूर्यवंशी गुरुजींचे पुन्हा उपोषण

0
20

बांधतलावावरील अतिक्र‘ण काढणे : भूमाफियांवर कारवाईची मागणी

गोंदिया, दि. ८ : सूर्याटोला परिसरातील शासकीय बांधतलाव भूमाफियांयांनी गिळंकृत केला. त्यामुळे पाणी साठवण क्षमता कम झाली. अतिक्रमण काढून भूमाङ्कियांवर कारवाई करण्यात यावी, या  मागणीकरिता सुर्याटोला येथील धन्नालाल सूर्यवंशी यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आज (८) पासून उपोषण सुरू केले.
सूर्याटोला परिसरातील बांधतलाव विस्तीर्ण जागेत आहे. गेल्या काही वर्षांपर्यंत या तलावातून परिसरातील शेतीला सिंचन होत होते. परंतु, हा तलाव शहराला लागून असल्याने भूमाङ्कियांची दृष्टी त्याकडे वळली.  तलावाच्या जागेवर अतिक्रमण केले. त्यात प्लािटग करून त्यांची विक्री केली. परिणामी तलावातील पाणीसाठा कमी झाला. पावसाळ्यातील पाणी वाहून जावू लागले. तलावाची साठवण क्षमता कमी झाल्यामुळे तलावातील पाणी पावसाळ्यात नाल्यांना वाहते. शहरातील रिंग रोड, कुडवा आदि भागातील घरांत पाणी साचते. गेल्या तीन वर्षांपासून हा प्रश्न बिकट झाला. अतिक्रमण काढून भूमाङ्कियांविरूद्ध कारवाई करण्यात यावी, याकरिता सुर्याटोला येथील ७३ वर्षीय सेवानिवृत्त शिक्षक धन्नालाल सर्यवंशी यांनी तीन महिन्यांपूर्वी आंदोलन केले. जिल्हाधिकारी सुर्यवंशी यांनी उपोषणाची दखल घेत मागण्या मान्य केल्या. परंतु, अद्याप त्यावर कृती करण्यात आली नसल्यामुळे धन्नालाल सूर्यवशी यांनी पुन्हा आज(८) गोंदिया उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. जोपर्यंत बांधतलावाचा प्रश्न निकली निघत नाही, तोपर्यंत स्वस्थ बसणार नसल्याचा इशारा धन्नालाल सूर्यवंशी यांनी दिला.आम आदमी पार्टीचे पुरुषोत्तम मोदी यांच्यासह ओबीसी सेवा संघ व ओबीसी संघर्ष कृती समितीने त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.