बाबासाहेबांची आंतरराष्ट्रीय धरोहर वाचवून गौरवान्वित झालो -ना.बडोले

0
11
गोंदिया : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अंतरराष्ट्रीय धरोहर लंडन चा घर, राष्ट्रीय धरोहर भिमा कोरेगाव (पुणे) येथील १३ एकड ची जमीन, मुंबई ची इंदुमिल ची १२ एकड जमीन, दिक्षा भुमी ला ५००  करोड रुपये मंजूर करवून आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळाचे रुपात ओळख बनवून देणे, दिल्ली चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १६ अलिपुरच्या घराला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करून १२० करोड रुपये खर्च करून त्याला विकसित करण्याचे कार्य आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याच ठिकाणी ग्रंथालय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या जिवनाशी जुडलेला                            पुस्तकांच्या इतिहासांची साक्षीला साक्षीमय करणे, तथागत गौतम बुद्ध यांच्या अस्थिकलश श्रीलंका वरून आणून विदर्भवासियांना दर्शनार्थ उपलब्ध करून मी आपल्याला                        गौरन्वित समझत असल्याचे मत सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले.
लॉर्ड बुद्धा मैत्री संघ गोंदियाच्या वतीने माता रमाई यांची ११९ वी              जयंती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी संयुक्त समारोह रेल्वे ग्राऊंड, सिव्हील लाईन गोंदिया येथे साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भंते संघधातू (डव्वा) हे होते. तर उद्घाटक म्हणून माजी आमदार दिलीप बंसोड होते यावेळी भैय्यासाहेब खैरकर,  आंबेडकरी विचारवंत सुषमा अंधारे, नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, पूर्व जि.प. उपाध्यक्ष विनोद अग्रवाल, न.प. सदस्य शिव शर्मा, विजय बहेकार, किसनिंसग बैस, संजय ओक्टे, अतुल वासनिक, जिल्हा प्रतिनधी रतन वासनिक, उपस्थित होते. याप्रसंगी ना. बडोले यांच्या लॉर्ड बुद्दा मैत्री संघ                  गोंदियाचे अध्यक्ष रतन वासनिक, विनोद जांभुळकर, रंजीत बंसोड, सुनील आवळे, प्रफुल भालेराव, कैलाश गजभिये, राजेश भोयर, राहुल वालदे, जिल्हा महिला अध्यक्षा ललिता बोम्बार्डे, शहर प्रतिनिधी               मिरा चिचखेडे आदी अन्य पदाधिकारी तसेच गोरेगाव, सडक अर्जुनी, देवरी, मारेगाव अर्जुनी, आमगाव तालुक्यातील प्रतिनिधींच्या हस्ते भव्य पुष्पहाराने स्वागत करण्यात आले. यावेळी रुढीवादी परंपरेच्या लढण्याच्या विरुध्दाच्या उदाहरण देतांना डॉ. सुषमा अंधारे (पुणे) म्हणाले की, महान त्यागी माता रमाई यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसाठी त्याग केला नसता, आपल्या ४ मुलांना गमवले नसते तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगाचे एकमात्र विद्वान पुरूष झाले नसते, आज हा भारताचा संविधान नसता, शोषीत-पिडीत-बहुजनांना कधीही न्याय मिळाला नसता. आज प्रत्येक स्त्रीने महान त्यागी माता रमाई चा त्याग आपला जिवनात उतरविल्यास माता रमाईचे प्रति विश्वसनीय आदरांजली होणार आहे असे म्हणाले. कार्यक्रमाची सुरुवात माता रमाई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तथागत बुद्ध, शिवाजी महाराज, महात्मा फुले, क्रांती ज्योती, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून बुद्ध वंदनेने झाली. त्यानंतर आंबेडकरी बाल संस्कार केंद्र कुंभारे नगर येथील कलाकारांनी इ.पी.पी. तो भगवा हे बुद्धावर आधारीत भरत नाट्यम नृत्य सादर केले व उपस्थित लोकांचा मन मोहला. कार्यक्रमाचा संचालन एंकर ज्योती भगत यांनी केले.