आ.अग्रवाल यांच्या पाठपुराव्याला यश ; डांगोरली बंधारा कामाला MWRRA ची मंजूरी

0
50

गोंदिया- गोंदिया विधानसभा मतदारसंघातील तेढवा जवळील डांगोरर्ली बॅरेजचे बांधकाम महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांच्या मान्यतेने करण्यात येणार असून यामुळे तेढवा-सिवनी आणि नवेगाव-देवरी व डांगोरली उपसा सिंचन योजनांना बळकटी मिळणार आहे. याचा फायदा पाणी साठवण आणि शेतजमिनीला होणार आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त पाणी आणि गोंदिया शहराच्या पिण्याच्या पाण्याचे समस्यांचे निराकरण करता येणार. यासाठी आमदार विनोद अग्रवाल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली असून, त्यावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता व बंधा-याच्या कामाला महाराष्ट्र राज्य जलसंपती नियमन प्राधिकरण अधिनियम २००५ चे कलम ११९(च) अन्वये दि.२४/०८/२०२२ रोजी मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे.तसेच पुढील टप्यामध्ये डांगोरली बंधा-याची शासनाकडून प्रशासकीय मान्यता घेउन लवकरच प्रकल्पाचे बांधकाम सुरु करण्याचे प्रस्तावित आहे.आ.विनोद अग्रवाल यांनी राज्यसरकारचे मनापासून आभार व्यक्त ही केले आहे.  आ.विनोद अग्रवाल यांनी जनतेची समस्या मांडून त्यांना नेहमीच पाठपुरावा करून त्यांच्या समस्या चे निराकरण करण्याचे कामे मागील अडीच वर्षापासून व राजकारणाची सुरुवात ही त्यांना अश्या बरेच कामे करून घेतली आहे. त्यांचे संपूर्ण जीवन सर्वांच्या हिताच्या तसेच समाजातील प्रत्येक गरजूपर्यंत व कुणालाही वंचित न ठेवता लाभ कसा देता येईल यावर त्यांचे लक्ष साधलेले असतात. तसेच आमदार झाल्यासपासून त्यांनी डांगोरलीचे बंधाराच्या बांधकामासाठी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री पासून सध्याचे मुख्यमंत्री यांचे पर्यन्त पाठपुरावा करुन शेतक-यांचे तसेच शहरवासियांची पाण्याची समस्या दूर होणार आहे.