२४० विद्यालयांचे शिष्यवृत्ती प्रस्ताव प्रलंबीत 

0
7
 
गोंदिया दि. १६: परिस्थितीवर मात करून शिक्षण घेता यावे, यासाठी समाजकल्याण विभागातर्पेâ महाविद्यालयीन तथा कनिष्ठ महाविद्यालयीन आणि व्यवसाय प्रशिक्षण विद्याथ्र्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. याकरीता चालु सत्रातच शिष्यवृत्तीचे अर्ज समाजकल्याण विभागाकडे पाठविणे आवश्यक आहे. परंतु गोंदिया जिल्ह्यातील तब्बल २४० विद्यालयातील शिष्यवृत्ती प्रस्ताव यंदाचे शैक्षणिक सत्र संपण्याच्या मार्गावर असतानाही आजपर्यंत पोहचले नाहीत. परिणामी विद्यार्थी                 शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
 इयत्ता ११ वी नंतरचे महाविद्यालयीन शिक्षण, उच्च शिक्षण आणि व्यवसायीक शिक्षण घेण्यासाठी मागासवर्गीय आणि इतर मागासवर्गीय विद्याथ्र्यांना शासनातर्पेâ शिष्यवृत्ती देण्यात येते. या शिष्यवृत्तीमुळे गरीब विद्याथ्र्यांना शिक्षण घेणे सोपे जाते. चालु सत्रातच ही शिष्यवृत्ती प्राप्त झाली तर विद्याथ्र्यांना अडचण येत नाहीत. परंतु विद्यालय व्यवस्थापन याकडे दुर्लक्ष करीत असल्यास यावर्षीची शिष्यवृत्ती त्या विद्याथ्र्याला दुसNया वर्षी मिळते. अनेकदा वेळेवर प्रस्ताव पोहोचले नसल्याने निधी परत जातो. अशीच स्थिती यंदासुद्धा निर्माण झाली आहे. गोंदिया जिल्ह्यात २७१ कॉलेज आहेत. यंदाच्या २ ०१५-१६ या शैक्षणिक सत्रासाठी या कॉलेजांमधील ३३ हजार २७१ अर्ज नोंदणीकृत करण्यात आले. यापैकी फक्त १ हजार ४४ अर्ज मान्य झाले असून ८७ हजार अर्ज त्रृट्यांमुळे नाकारण्यात आले. यंदाचे सत्र संपण्याच्या मार्गावर असताना आजघडीला तब्बल २५ हजार २६९ शिष्यवृत्तीचे अर्ज महाविद्यालय पातळीवर प्रलंबीत आहेत. तर ६ हजार ८७१ जिल्हा पातळीवर प्रलंबीत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. विशेष म्हणजे विद्याथ्र्यांच्या शिष्यवृत्तीचा महाविद्यालय व्यवस्थापनाला कळवळा असायला पाहिजे.  परंतु समाजकल्याण विभाग शिष्यवृत्ती द्यायला तयार असताना सत्र लोटले परंतु २५ हजारावर प्रस्ताव पोहचलेच नसल्याने महाविद्यालयीन व्यवस्थापनच याबाबद उदासीन असल्याचे जाणवते. विशेष म्हणजे मागच्या २०१४-१५ या शैक्षणिक सत्रात ३३ हजार २९९ अर्ज नोंदणीकृत होते. यापैकी २९ हजार ६९१ अर्ज मान्य झाले तर १७६ अर्जांमध्ये त्रृट्या आढळल्या. मागचे सत्र संपले, यंदाचेही सत्र            संपत चालले आहे तरी देखील मागच्या २०१४-१५ या सत्रातील २ हजार ६०६ शिष्यवृत्तीचे अर्ज महाविद्यालय पातळीवरच गटांगळ्या खात आहेत तर त्रृट्यांमुळे ८२६ अर्ज जिल्हा पातळीवर प्रलंबीत आहेत. सत्र २०१४-१५ मधील प्रवर्गनिहाय अनुसूचित जातीचे १ हजार ७१, इतर मागास प्रवर्गाचे १ हजार ९८१, वीमाप्र २४६, विजाभज ३१० असे ३ हजार ६०८ प्रस्ताव प्रलंबीत आहेत तर यंदाचा २०१५-१६ शैक्षणिक सत्राचे प्रवर्गनिहाय अनुसूचित जातीचे ७ हजार २२३, इतर मागास वर्ग २१ हजार २६०, विमाप्र १ हजार ७६२, विजाभज १ हजार ९८२ असे एवंâदरीत ३२ हजार २२७ प्रस्ताव प्रलंबीत आहेत. दोन्ही शैक्षणिक सत्रातील जवळपास ३५ हजार ५७२  शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबीत आहेत.  शिष्यवृत्ती वेळेवर प्राप्त होत नसल्यास अनेकदा समाजकल्याण विभागालाच धारेवर धरले जाते. परंतु सत्र संपला असतानाही महाविद्यालयातून शिष्यवृत्तीचे अर्ज पोहचत नसतील तर याला काय म्हणावे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.