आयटीआयच्या ६२ प्रश्नपत्रिका पडल्या कमी

0
15

गोंदिया,दि.१७-गेल्या २१ जानेवारीपासून सुरू झालेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थे(आयटीआय)च्या तिसèया सत्रातील ़थेयरी परीक्षेदरम्यान मंगळवारला घेण्यात येणाèया ४ शाखेतील ६० ते ६२ प्रश्नपत्रिका कमी पडल्याने निर्धारीत वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने सुरू झाल्याचा प्रकार घडला.प्रश्नपत्रिका कमी जाणे हा काही नवीन प्रकार नसून नेहमीच घडत असते तरीही याकडे शासनाचे लक्ष का जात नाही अशा प्रश्न निर्माण झाला आहे.गोंदिया आयटीआयचे प्राचार्य आर.ए.रहमतकर यांनी दिलेल्या माहितीनुसार डीजीटी दिल्लीवरून प्रश्नपत्रिका पोस्टाने येतात.आधी त्या बँकेत ठेवल्या जातात.परीक्षेच्या दिवशी पेपर सुरू होण्याच्या १ तास आधी प्रश्नपत्रिका आणल्या जातात.आणि सुरू होण्याच्या अर्धातास आधी विद्यार्थी संख्येच्या बरोबर आहेत की नाही हे तपासले जाते.कमी आढळल्यास लगेच गुप्त ठिकाणी स्थानिक पातळीवरच त्या प्रश्नपत्रिकेची झेराक्स काढली जाते.आज सुध्दा इलेक्ट्रीकल शाखेचे ३५,फिटर -१२,मोटर मॅकनिक -८ आणि वायरमनचे ७ प्रश्नपत्रिका कमी पडल्या.त्यामुळे त्या प्रश्नपत्रिकेच्या झेराक्स काढायला थोडा वेळ लागल्याने १०.३० ला सुरू होणारा पेपर हा १०.४० सुरू करून विद्याथ्र्यांना १० मिनिटे अधिक देण्यात आल्याची माहिती रहमतकर यांनी दिली.ही परीक्षा येत्या २२ फेबुवारीपर्यंत चालणार आहे.विशेष म्हणजे प्रश्नपत्रिका कमी पडणे हा नेहमीचाच भाग झाल्याचे त्यांनी सांगितले तसेच राज्यातील बहुतांश परीक्षा केंद्रावर अशीच परिस्थिती राहत असल्याचेही त्यांनी सांगितले.