जहाल नक्षली नवलू पोटावी यास अटक

0
6

गडचिरोली,दि.१६: सुमारे ६ लाख रुपयांचे बक्षीस असलेला जहाल नक्षलवादी, अॅक्शन टीमचा सदस्य व जनताना सरकारचा अध्यक्ष नवलू गजू पोटावी(३५) यास पोलिसांनी काल(ता.१५) एटापल्ली तालुक्यातील जारावंडीच्या जंगलातून अटक केली.

नवलू पोटावी हा छत्तीसगड राज्यातील कांकेर जिल्हयातील पाखांजूर तालुक्यातील गोटूलवाडा येथील रहिवासी असून, त्याचा छत्तीसगड व गडचिरोली जिल्हयातील अनेक गुन्हयांमध्ये सहभाग होता, अशी माहिती पोलिसांनी पत्रकाद्वारे दिली आहे. जारावंडी व बांडे येथील चकमकी व वाहन जाळपोळीच्या तीन गंभीर गुन्हयांमध्ये तो सहभागी होता. न्यायालयाने त्याला १७ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.