आधी मुका मार; नंतर आधार! देवा,कृषी खात्याचा अजब रे कारभार…!!

0
30

प्रसिद्धी माध्यमातून कृषी अधिकाèयांनी करवून घेतले स्वतःचे कौतुक

गोंदिया दि.१७-गेल्या चार वर्षापासून बिलासाठी अक्षरशः झुलवले. आपल्या बिलाचे पैसे मिळावे म्हणून तब्बल चार वर्षे कृषी खात्याचे उंबरठे झिजविले. तरीही प्रशासनाला त्याची दया आली नाही. त्या शेतकèयाने केविलवाणी विनवणी केली, कार्यालयाच्या चकरा मारत आर्थिक फटका सोसला. अनेकदा मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागले. तरीही कृषी अधिकाèयांच्या हृदयाला पाझर फुटला नाही. हतबल झाल्याने अखेर उपोषणाचा हत्यार उपसले. त्याने आपल्याच शेतात अन्नत्याग केला. प्रकरण अंगलट येत असल्याचे पाहून कृषी अधिकारी खडबडून जागे झाले. अन… शेवटी त्या शेतकèयांच्या बांधावर धाव घेत ७ लाख ९१ हजाराचा धनादेश पोचता केला. मात्र,असे करताना माध्यमांचा आधार घेत स्वतःची पाठ थोपटून घेण्यात कृषी अधिकारी याहीप्रसंगी मागे पडले नाही, हे महत्त्वाचे. परिणामी, जिल्ह्यातील शेतकèयांच्या तोंडून आपसूकच शब्द फुटले, ‘आधी बसला मुका मार; मग मिळाला आधार! देवा, कृषी खात्याचा असा कसा रे अजब कारभार…!!ङ्क
तालुका कृषी कार्यालयाच्या माध्यमातून अर्जुनी मोरगाव तालुक्यात सन २०१२-१३ मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून शतकोटी वृक्ष लागवड करण्यात आली. यासाठी लागणारे रोपटे हे आसोला येथील शेतकरी येरणे यांचेकडून घेण्यात आले. श्री येरणे यांनी आपल्या रोपवाटिकेतून कृषी विभागाला आंबा व सागवानाची ७ लाख ९१ हजार ७९३ रुपये किमतीचे रोपटे पुरविले. या कामाचे मोजमाप करून २३ जानेवारी २०१३ रोजी तालुका कार्यक्रम अधिकारी यांचेकडे देयके सुद्धा सादर करण्यात आली. मात्र, चार वर्षाचा कालावधी लोटूनही श्री येरणे यांच्या हातात दमडी देखील पडली नाही. श्री येरणे यांनी आपल्या घामाचे पैसे मिळविण्यासाठी कृषी खात्याच्या तालुका कचेरी ते जिल्हा कचेरी पर्यंत कितीतरी चकरा मारल्या. पण काही उपयोग झाला नाही. कृषी खात्याच्या अशा कारभाराला कंटाळून श्री येरणे यांनी अनेकवेळा आत्महत्येचा इशारासुद्धा कृषी अधिकाèयांना दिला. मात्र, या इशाèयाला गांभीर्याने घेईल तो कृषी विभाग कसला? प्रत्येकवेळी श्री येरणे यांच्या विनंतीला केराच्या टोपलीत टाकून त्यांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला.
शेवटी श्री येरणे यांचेकडे कोणताही पर्याय कृषी विभागाने सोडला नाही. परिणामी, आत्महत्या करण्याऐवजी शेवटचा उपाय म्हणून शांततेच्या मार्गाने त्यांनी आपल्या शेतातच गेल्या ५ तारखेपासून अन्नत्याग केला. याची वार्ता कृषी अधिकाèयांच्या कानावर पोचली. आता आपले qबग फुटणार याची पुरती कल्पना कृषी खात्यातील अधिकाèयांना आली होती. मग पळापळ झाली. येरणे यांची समजूत काढण्यासाठी तालुका कृŸषी अधिकाèयांची स्वारी थेट येरणे यांचे बांधावर पोचली. आश्वासनांची खैरात वाटण्याचा (राजकीय) डाव सुरू झाला. पण खात्याचा चांगलाच अनुभव आलेल्या येरणे यांनी आपले पैसे मिळाल्याशिवाय आपण मागे हटणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला. शेवटी पैसे दिल्याशिवाय आपले काही खरे नाही, हे कृषी अधिकाèयांच्या लक्षात आले. शेवटी कृषी खात्याने ७ लाख ९१ हजाराचा धनादेश आणि ८०० रोखीने श्री. येरणे यांना अदा केले. श्री येरणे यांचे हे हक्काचे पैसे मिळविण्यासाठी स्वतःच्या जिवाचा डाव खेळावा लागला. मात्र, त्यातही कृषी अधिकाèयांनी राजकारण केले. प्रसिद्धी मिळविण्यासाठी राजकारण्यांच्या तोèयात येरणे यांना भाकर-ठेचा चारून उपकार करत असल्याचे प्रदर्शन मांडले. आणि माध्यमप्रतिनिधीला हाताशी धरून आपले फोटो छापून प्रसिद्धी मिळविली. पण त्या वृत्तात त्या शेतकèयाला सोसाव्या लागलेल्या हालअपेष्टांबद्दल एकाही अधिकाèयांने दिलगिरी व्यक्त केली नाही, हे येथे उल्लेखनीय.
एकीकडे आपले सरकार शेतकèयांच्या हिताच्या वल्गना करते. तर दुसरीकडे त्यांचेच अधिकारी गरीब शेतकèयांची कशी पिळवणूक करतात, याचे हे उत्तम उदाहरण आहे. चार वर्षे त्या शेतकèयाला का झुलवले, याचे उत्तर जिल्ह्यातील शेतकèयांना का दिले गेले नाही. जेव्हा तो गरीब शेतकरी कृषी खात्याचे उंबरठे झिजवत होता, तेव्हा कृषी खात्याकडे त्याला द्यायला पैसे नव्हते. आणि त्याने अन्नत्याग सुरू करताच एका झटक्यात बिल अदा करण्यासाठी निधी कोठून आला? हा प्रश्न जिल्ह्यातील शेतकèयांनी कृषी खात्याला विचारला आहे. विनाकारण त्या शेतकèयाचा मानसिक व आर्थिक छळ करण्यामागे त्या अधिकाèयांचा कोणता उद्देश होता? याचा जाब सरकार वा त्यांचे प्रतिनिधी त्या अधिकाèयाला विचारतील की गोंदिया जिल्ह्यातील जनतेचा सूड घेण्यासाठी अशा अधिकाèयांचा मनोधैर्य उंचावण्याला हे प्रकरण वाèयावर सोडतील? जिल्ह्यात अशी अनेक प्रकरणे असू शकतील, याचा शोध घेण्याचा प्रयत्न या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केला पाहिजे. अन्यथा सरकारने जनविकासाच्या कितीही गप्पा मारल्या, तरीही अशा बेदरकार अधिकाèयांमुळे नागरिकांना त्यांच्या हक्कांपासून दूर ठेवले जाईल, याची कोणीतरी दखल घेतली पाहिजे.