महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटनेचे कार्य कौतुकास्पद- राजकुमार बालपांडे

0
25

आर.एस.पी.ची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

भंडारा – महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन भंडाराच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून प्रामुख्याने उपस्थित मुख्याध्यापक संघ भंडाराचे अध्यक्ष तसेच कार्याध्यक्ष आर.एस.पी अँन्ड सी.डी व राज्य सल्लागार समितीचे सदस्य  राजकुमार बालपांडे म्हणाले,की आमचे जीवन सेवेसाठी हे ब्रीदवाक्य स्वीकारुन आर.एस.पी चे कार्य निस्वार्थ भावनेने करण्याऱ्या शिक्षकांना, शिक्षण विभागाने आणि पोलीस विभागाने सहकार्य करणे आवश्यक आहे.कोणत्याही प्रकारचे मानधन न घेता स्वतः या कार्यात झोकून देऊन कार्य करणाऱ्या शिक्षकांचा आम्हाला अभिमान आहे.आर.पी.संघटनेचा विस्तार महाराष्ट्र राज्यच नाही तर देशपातळीवर विस्तार करण्याबाबत रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे यावेळी ते म्हणाले. राज्यपातळीवर कार्य करणारी आर.एस.पी. नागपूरची ही एकमेव संघटना असल्याचेही ते म्हणाले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे महासमादेशक मधुकरराव तिडके तर अतिथी म्हणून राज्य समन्वय समितीचे सदस्य श्याम फाळके, कार्याध्यक्ष आर.एस.पी.अँन्ड सी.डी.भंडारा राजकुमार बालपांडे, नागपूर जिल्हा समादेशक विलास गांगुलवार, जिल्हा वाहतूक नियत्रंण शाखा भंडाराचे पोलीस निरीक्षक विश्वजित कदम, मोटर वाहन निरीक्षक भंडारा शरद वाडकर, सहायक मोटर वाहन निरीक्षक अभिजित वाघे,विभागीय समादेशक देवराव सानेकर, लक्ष्मीनारायण विद्यालय साकोलीचे मुख्याध्यापक मुंगमोडे,शिक्षण विभागाचे वाकळकर,नूतन विद्यालय भंडारा मुख्याध्यापिका चित्रिव मँडम, उपमुख्याध्यापिका मालूताई भदाडे, भंडारा जिल्हा समादेशक वासूदेव आर.चरडे, आर.एस.पी.अधिकारी विजय केवट,चहांदे मँडम,प्रा.विनोदकुमार माने व भंडारा जिल्ह्यातील सर्व आर.एस.पी.अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.स्वागत गीताने प्रमुख अतिथींचे स्वागत करण्यात आले तसेच सर्व उपस्थित मान्यवरांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व रोपटे देऊन सत्कार करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे आर.एस.पी.चे समादेशक मधूकरराव तिडके, विशेष अतिथी श्याम फाळके, देवराव सानेकर, राजकुमार बालपांडे, विश्वजित कदम, मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच उपस्थित सर्व आर.एस.पी.अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. सभेत प्रामुख्याने दिवसेंदिवस वाढणाऱ्या अपघाताचे प्रमाण लक्षात घेता विद्यार्थ्यांमध्ये ट्रॅफिक सेन्स निर्माण करणे, आरएसपी अभ्यासक्रम विद्यालयात राबवणे, संस्कार शिबिर स्थळाची निवड करणे, अध्यक्षाच्या परवानगीने वेळेवर येणारे विषय आदिवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक भंडारा जिल्हा समादेशक डब्ल्यू.आर.चरडे यांनी केले.कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन प्रा. विनोदकुमार माने तर आभार आरएसपी अधिकारी विजय केवट यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नूतन कन्या विद्यालय भंडारा येथील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच आरएसपी अधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले.