युवा स्वाभिमानतर्पेâ युवा जागृती मेळाव्याचे आयोजन 

0
9
गोंदिया : युवक जागृत झाला तरच देशाचा विकास होईल ही बाब लक्षात घेवून युवा स्वाभिमान                जिल्हा गोंदियाच्यावतीने  येत्या २१ पेâब्रुवारी २०१६ रोजी दुपारी १२ वाजता शारदा कॉन्व्हेंट स्टेट बँक कॉलोनी येथे युवा जागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला युवा स्वाभिमानचे संस्थापक रवि राणा व मार्गदर्शिका सौ.नवनित राणा उपस्थित राहणार असल्याची  माहिती गोंदिया जिल्हा युवा स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष जितेश राणे यांनी विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला गोंदिया जिल्हा युवा स्वाभिमानचे मार्गदर्शक वाय.पी.येळे, जिवन लंजे, टोकेश हरिणखेडे, धनजीत बैस, कमलेश बोपचे, जगदीश रहांगडाले, रमेश रिनाईत व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
जितेश राणे यांनी पत्रकारांना माहिती दिली की, मागील सहा महिन्याआधी त्यांची जिल्हाध्यक्ष या पदावर नेमणूक झाली असून त्यांनी सर्व प्रथम संघटना बांधणीकडे लक्ष दिले आहे. जिल्ह्यातील तीन तालुक्यात त्यांनी कार्यकत्र्यांची फळी उभारली असून सर्वांच्या सहकार्याने शेतकरी, तरूण व महिलांसाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहे. २१ पेâब्रुवारी रोजी आमदार रवि राणा यांच्या हस्ते युवा स्वाभिमानाच्या रुग्णवाहिकेचेही शुभारंभ होणार असून रुग्णांच्या सेवेसाठी हे वाहन नि:शुल्क उपलब्ध असल्याचे          त्यांनी सांगितले.
आगामी नगरपरिषदेच्या निवडणूकापर्यंत गोंदिया शहरातील संघटनेची बांधणीचे कार्य पूर्ण होणार व युवा स्वाभिमान नगर परिषद निवडणूकात सहभागी होणार विंâवा  नाही याचा निर्णय युवा स्वाभिमानचे अध्यक्ष आमदार रवि राणा घेणार असल्याचे त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. या प्रसंगी वाय.पी.येळे व जिवन लंजे यांनी ही संघटनेतर्पेâ चालविले जाणाNया उपक्रमाची माहिती दिली. दरम्यान २१ पेâब्रुवारी रोजी आयोजित युवा जागृती संमेलनात जिल्ह्यातील तरूण-तरूणींनी हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन युवा स्वाभिमान तर्पेâ करण्यात आले.