जि. प. सदस्याच्या डोळ्यात फेकली मिरची पूड

0
13

जागेचा वाद उफाळला : ठाणेदारांनी काढली जमावाची समजूत

अर्जुनी मोरगाव,दि. १९ : मोरगाव (अर्जुनी) येथे जागेच्या वादावरून दोन गटांत भांडण झाले. त्याचे पर्यवसन हाणामारीत झाले. याच प्रकरणावरून जिल्हा परिषद सदस्य गिरीष पालीवाल यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून मारहाण केली. ही घटना आज ( १९) सकाळी ९ वाजता घडली. गिरीष पालीवाल यांच्या तक्रारीवरून अर्जुनी मोरगाव पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल करून अटक केली.

मोरगाव येथे गिरीष देवीदान पालीवाल यांची मालकीची मोकळी जागा आहे. १९ फेब्रुवारी रोजी जि.प.सदस्य गिरीष पालीवाल हे आपल्या भावासह आपल्या मालकीच्या जागेवर तारेचे कुंपन करीत होते. आरोपी मुरारी पुंडलीक लोधी वय ४८), शामराव पांडूरंग मस्के (वय ५०), प्रभू जनार्धन मस्के (वय ४५), माणीक जनार्धन मस्के (वय ४३) सर्व रा. मोरगाव यांनी संगणमत करून गिरीष पालिवाल यांना कुंपन करू नका, असे म्हणत त्यांच्याशी भांडण करून डोळ्यात मिरची पूड टाकली. लाथाबुक्यांनी मारहाण करत शिविगाळ करून मारण्याची धमकी दिली. तक्रारीवरून अर्जुनी मोरगाव पोलिसांनी मुरारी पुंडलिक लोधी, शामराव पांडुरंग मस्के, प्रभू जनार्धन मस्के, माणीक जनार्धन मस्के यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली. दोन गटात वाद व हाणामारी झाली असताना गिरीष पालीवाल यांच्या बाजूने मोरगाव येथील शेकडो ‘हिला पुरुष पोलिस ठाण्यावर धडकले. मोकळी जागा गिरीष पालीवाल यांचीच आहे, असे सांगून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली. यावर ठाणेदार नामदेव बंडगर यांनी गावकèयांची समजूत काढली. निमालाबाई मुरारी लोधी (वय ४५, रा. मोरगाव) यांच्या तक्रारीवरून गैरअर्जदार बबलू उईके भगवती प्रसाद पालीवाल व इतरांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदविला.