ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे गोरेगाव पंचायत समितीसमोर आंदोलन

0
19

गोरेगाव,दि.03ः- ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ तालुका गोरेगावच्यावतीने आज दि.03 आँक्टोंबरला शासन व ग्रामपंचायतस्तरावरील मागण्याला घेऊन पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा अध्यक्ष हौसलाल रहागंडाले यांनी केले.आंदोलनात बुधराम बोपचे सचिव, उत्तम डोंगरे अध्यक्ष, सोमेश्वर राऊत, निलेश मस्के, हिरोज राऊत, तुलसीदास चौधरी, मिथुन राऊळकर, जीवन मेश्राम, शुभम तिरपुडे, रामेश्वर वाघाले आदी सहभागी झाले होते.या धरणे अंदोलनाला पंचायत समिती सभापती मनोज बोपचे यांनी भेट देऊन ग्रामपंचायत स्तरावरील तक्रारी निवारण करण्याचे आश्वासन दिले.धरणे अंदोलन हे अभय यावळकर समितीच्या शिफरसीनुसार ग्रामपंचायत कर्मचारी यांना वेतन श्रेणी लागू करणे.10 आगष्ट 2020 रोजी मान्य केलेले वाढीव किमान वेतनाची 57 महिन्याची फरकाची रक्कम त्वरीत देणे.वेतनाकरिता असलेली वसुलीची अट्ट रद्द करून वेतन देणे.10 टक्के आरक्षण नुसार नियमित भरती करणे.किमान वेतन व राहणीमान भत्ता सहित वेतन शासन तिजोरीतून पूर्ण देणे आदी मागण्यांना घेऊन करण्यात आले.