केंद्राकडून कचारगडसाठी ३.२६कोटी

0
13

सालेकसा : कचारगड देवस्थानाचा पर्यटनच्या दृष्टीने विकास करण्यासाठी केंद्र शासनाच्या आदिवासी विभागाकडून तीन कोटी २६ लाख मंजूर करण्यात आले असून येत्या मार्च अखेर तो निधी कचारगडच्या विकासासाठी उपलब्ध होईल, अशी माहिती खा. अशोक नेते यांनी गोंडवाना महासंमेलनादरम्यान मार्गदर्शन करताना दिली.
गोंडवाना महासंमेलनाचे उद््घाटन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी केले. अध्यक्षस्थानी खा. अशोक नेते होते.प्रमुख अतिथी म्हणून आर्णिचे आ. तोडसाम, गोंडराजे वासुदेव शाह टेकाम, भाजप नेते राकेश शर्मा, जि.प. सदस्य विजय टेकाम, गोंडी धर्माचार्य दादा हिरसिंह मरकाम, शेरसिंह आचला यांच्यासह अनेक राज्यातून आलेले आदिवासी समाजाचे वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी, सालेकसाचे तहसीलदार प्रशांत सांगळे, प्रभारी प्रकल्प अधिकारी मीनाक्षी उन्हाळे व इतर मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी सर्व प्रथम भूमकाल यांनी १२ सगापेन व ७५0 गणगोत पूजा करुन उद््घाटन महोदयांना दीप प्रज्वलित करण्यात लावले. संपूर्ण कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून आमगावचे आमदार संजय पुराम यांनी हळदीचा पिवळा टीेका लावून अतिथीचे स्वागत केले.
या प्रसंगी खा. नेते म्हणाले की गोंडी संस्कृती ही सर्वश्रेष्ठ संस्कृती असून यात पर्यावरण रक्षणासाठी विशेष भर दिला जातो. खर्‍या अर्थाने आदिवासी समाज हा नैषर्गिक संपत्तीचा रक्षण कर्ता आहे. म्हणून त्यांच्या श्रद्धास्थाने विकास करणे गरजेचे आहे.त्यामुळे आदिवासीचे सुद्धा विकास होईल. याप्रसंगी ना. बडोले म्हणाले की संस्कृती व परंपरा जपण्यामध्ये आदिवासी समाज सदैव तत्पर राहीला आहे.