निंबा येथे वन्यजीव सप्ताहनिमित्त स्पर्धांचे आयोजन

0
26

गोरेगाव,दि.07ः- वन विभाग गोरेगावच्यावतीने जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा निंबा येथे वन्य जिव सप्ताहानिमित्त 1 ली ते 4 थ्या वर्गाकरिता चित्रकला स्पर्धा तसेच वन्यजीवांचे रक्षण करण्याकरिता वन्यजीवांचे महत्त्व या विषयांवर पाच ते सातवीच्या विद्यार्थासांठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या वन्यजीव चित्रकला स्पर्धेत रोहन मिताराम गौतम वर्ग चौथा प्रथम क्रमांक, तर मयूर संतोष सेउत वर्ग दुसरा द्वितीय क्रमांक, आणि आर्वी सुखदेव बघेले वर्ग पहिला यांनी तृतीय क्रमांक पटकावले. तसेच निबंध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्रियांशू मनोज जनबंधू वर्ग सातवा,द्वितीय क्रमांक वंश विजयकुमार कोचे वर्ग सातवा आणि तृतीय क्रमांक अथांग मदनलाल कोटांगले वर्ग पाचवा याने पटकावला. स्पर्धेतील विजेत्यांस वन विभाग गोरेगाव तर्फे आकर्षक बक्षिसे देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. शिवाय शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना पेन वितरित करून वन्यजीवांच्याबद्दल प्रेम व आपुलकी निर्माण करण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम वन विभागातर्फे शाळेमध्ये आयोजित करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. आर.डी. भेंडारकर क्षेत्र सहाय्यक वन विभाग गोरेगाव, हे होते. प्रमुख अतिथी म्हणून बि.डी .रहांगडाले वनरक्षक, पवन कुमारर,यादव मॅडम ,वाढई मॅडम उपस्थित होते.तसेच जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक  आर. एच.नंदेश्वर ,बी. एच कोहरे आर.डी बनसोड, जी. आर .मरस्कोल्हे  आणि वन कर्मचारी उपस्थित होते.
वन्य प्राण्यांच्या विषयी जनजागृती करण्यासाठी रॅली काढण्यात आली. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष भेंदरकर  यांनी वन्यजीवांची आवश्यकता व त्यांच्या रक्षण करण्याची जबाबदारी याविषयी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संचालन आर.डी . बंसोड आणि आभार यादव मॅडम यांनी मांनले.