मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पोलीस कर्मचारी वसतिगृहाचे उदघाटन

0
8

गडचिरोली : पोलीस मुख्यालय परिसरात कर्मचाऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या पोलीस वसाहतीचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

याप्रसंगी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री राजे अम्बरीशराव आत्राम, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम, नक्षल विरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक शिवाजी बोडखे, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय लाटकर, जिल्हाधिकारी रणजित कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर प्रामुख्याने उपस्थित होते.

याठिकाणी १६ बराकी असून १००० पोलीस कर्मचारी राहतील, अशा पद्धतीने खोल्या तयार करण्यात आल्या आहेत. सदर इमारतीचे बांधकाम १८ एप्रिल २०१३ रोजी सुरू करण्यात आले होते. त्याचे काम ३० सप्टेंबर २०१४ रोजी पूर्ण करण्यात आले.