धापेवाडा उपसा सिंचनचे पाणी नियमित मिळण्याकरिता वीज बिल वेळेवर भरा- आ. रहांगडाले

0
24

तिरोडा:- धापेवाडा उपसा सिंचन योजना तिरोडा व गोंदिया तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी वरदान ठरली असून या योजनेचा चाक्राकार पद्धतीने रबी धान उत्पादक शेतकऱ्यांना पाणी पुरवठा करण्यात येतो. रबी हंगाम २०२१ मध्ये कवलेवाडा वितरिकाद्वारे बेलाटी,मुंडीपार,घाटकुरोडा,धादरी,तिरोडा, मांडवी, चांदोरी, बिरोली येथील शेतकऱ्यांना पाणीपुरवठा करण्यात आला होता. चक्राकार पद्धतीनुसार रबी हंगाम २०२२ मध्ये कवलेवाडा, चीरेखनि,मरारटोला, मुंडीपार,पुजारीटोला, तिरोडा व धादरी येथील शेतकऱ्यांना पाणी मिळणार असून यावर्षी एकूण धरणात १२.२९ मी.मी.क्युसेक अर्थान २७ टक्के पाणी साठा असून शेवटच्या शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये २६ तासात पाणी पोहोचणार असल्याची माहिती विभागाद्वारे देण्यात आली त्याकरिता शेतकऱ्यांनी वीज बिल वेळेवर भरण्याचे आदेश आमदार यांनी आढावा बैठकीत दिले. वितरिकेची दुरुस्ती करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करून निधी मिळवून देण्याची ग्वाहीसुद्धा दिली. रबी हंगाम २०२२-२३ मध्ये १७०० हेक्टर जमीन सिंचनाचे नियोजन असल्याची माहिती विभागाद्वारे देण्यात आली. या आढावा बैठकीमध्ये जी.प.सदस्य प्रवीण पटले, भाजप शहरअध्यक्ष स्वानंद पारधी, प.स.सदस्या सौ.वनिता भांडारकर, कार्यकारी अभियंता अंकुर कापसे, उपअभियंता पंकज गेडाम,प्रणय नागदेवे,प्रवीण भलावी व विभागाचे अधिकारी व लाभक्षेत्राअंतर्गत शेतकरी उपस्थित होते. या बैठकीमध्ये पाणी पट्टी वसूल करण्यासाठी गावागावात कॅम्प लावण्याचे निर्देश देण्यात आले.