शहारेंना गुणवंत कर्मचारी पुरस्कार जाहीर

0
14

गोंदिया,दि.02- महाराष्ट्र शासनाच्यावतीने दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यातून निवडल्या जाणार्या गुणवंत कर्मचारी पुरस्कारासाठी नागपूर विभागातील जिल्हा परिषद गोंदियाच्या सामान्य प्रशासन विभागाचे कनिष्ट प्रशासन अधिकारी पी.जी.शहारे यांची निवड झाली आहे.शहारे यांना 2015 चा गुणवंत कर्मचारी पुरस्कार लवकरच शासनाच्यावतीने आयोजित एका कार्यक्रमात दिला जाणार आहे.शहारे यांनी मिळालेल्या पुरस्काराबद्दल जि.प.चे सर्व वरिष्ठ अधिकारी,सहकारी मित्रांचे आभार मानले आहे.