उपसरपंच रवि तरोणे यांच्या पाठपुराव्याने इर्रीच्या40 कुटुंबांना मिळाले राशन

0
25

गोंदिया : तालुक्याच्या इर्री येथील माजी उपसरपंच रवि तरोणे हे सामाजिक व लोकहिताच्या कार्यासाठी नेहमी चर्चेत राहत असतात. असेच उत्तम कार्य गोरगरिबांना त्यांच्या हक्काचे राशन मिळावे यासाठी उपसरपंच रवी भाऊलाल तरोणे यांनी वर्षभर शासनाच्या दारी खटाटोप करून इर्री येथील वंचित असलेल्या गोरगरिबांना राशन मिळवून दिले. इर्री येथील 40 कुटुंबांना राशन सुरू झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत आहे. मागील वर्षी रवि तरोणे यांनी 50 गरजू कुटुंबांना राशन मिळवून दिले असे एकूण 90 गरजू कुटुंबांना राशन मिळवून दिले. घरची परिस्थिती हलाकीची असूनही गरजूंना शासनाच्या मोफत धान्य मिळत नव्हते. त्यातील काहींचे राशन कार्ड होते तर, काहींचे राशन कार्ड असूनही त्यांना योजनेचे धान्य मिळत नव्हते. मागील दहा ते पंधरा वर्षांपासून राशनसाठी त्यांची ओरड होती. गावाची जबाबदारी येऊन ठेपली तेव्हा उपसरपंच रवी तरोणे यांनी गावातील लोकांना शासकीय योजनांचा फायदा कसा देता येईल, यासाठी प्रशासनाच्या दरबारी फेरफटका मारला. ज्यांचे राशन कार्ड आहेत त्यांना राशन का मिळत नाही. त्यांच्या हक्काचे राशन जाते कुठे? कुणाचा राशन कार्ड नाही, अशा परिस्थितीत त्यांचे राशन कार्ड तयार करून दिले. अन्न पुरवठा निरीक्षक यांची भेट घेवून धान्य मिळवून दिले.