नेतृत्वाचा लढा युवा लढवणार-पूर्णा

0
10

नवेगावबांध : कृषी उत्पन्न बाजार समिती नवेगावबांध येथे घेण्यात आलेल्या युवक तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकास्तरीय मेळाव्यात नेतृत्वाचा लढा क्रांतिकारी युवा लढवणार, असे प्रतिपादन राष्ट्रवादीच्या युवा नेत्या पूर्णा पटेल यांनी केले.
तालुका विद्यार्थी युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तालुकास्तरीय मेळाव्याचे उद््घाटनपूर्णा पटेल यांनी केले. अध्यक्षस्थानी आ.राजेंद्र जैन होते. यावेळी विनोद हरिणखेडे, मनोहर चंद्रिकापुरे, किशोर तरोणे, चित्रलेखा मिश्रा, केतन तुरकर, प्राचार्य परशुरामकर, डॉ. रोहीत गावीळ, सोनदास गणवीर, योगेश नाकाडे, अनित मेहता, सुशीला हलमारे, नितीन धोटे, सुधीर साधवानी, कुंभरे, राकेल लंजे, बंडू भेंडारकर, भोजराम रहेले उपस्थित होते. याप्रसंगी हर्षद हलमारे, अनिल पालीवाल, दिनदयाल नागपुरे, अरविंद चांदेवार, योगराज रुखमोडे, संजय लाभकाने, नरेश आदमने, नरेश चांदेवार, मोरेश्‍वर बावणे, रामप्रसाद रॉय, दयाराम हातझाडे, भास्कर बाळबुध्दे, अरुण ढवळे या युवकांचा सत्कार करण्यात आला. संजय कांबळे, नकुल शेंडे, योगराज शेंडे, विजय मेश्राम, गुरुदेव राऊत, हेमंत कोल्हे यांनी पक्षात प्रवेश केला.यावेळी मनोहर चंद्रिकापुरे, आ.राजेंद्र जैन, केतन तुरकर, किशोर तरोणे यांनी मार्गदर्शन केले.
पटेल पुढे म्हणाल्या, राष्ट्रवादीने आता परिवर्तन करून युवकांना समोर केले आहे.सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. या बजेटमध्ये दुष्काळाचे नावच नाही, साधा विचारही नाही, आलेल्या अनेक विभागांच्या निधीचा लाभ अजूनही नाही. पदवीधरासांठी नोकरीचा पत्ता नाही. म्हणून आता शेतकर्‍यांसाठी व देशासाठी युवाच क्रांती करणार व रस्त्यावर येणार अशी ग्वाही पूर्णा पटेल यांनी युवकांना दिली.