यशस्वी योजनेसाठी उद्देश प्रामाणिक असावा -पुराम

0
11

देवरी : अनुसूचित क्षेत्रातील कुपोषणाचा वाढत्या संख्या पाहता शासनाने आपल्या जिल्ह्यातील चार तालुक्यातील गरोदर व स्तनदा मातांना दररोज एक वेळ संतुलीत आहार देण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे.योजना देणारे सक्षम आहेत. परंतु योजना घेणारे प्रामाणिक असले तर कोणतीही योजना अयशस्वी होऊ शकत नाही, असे प्रतिपादन आ. संजय पुराम यांनी केले.
३मार्च रोजी बुधवारला सिलापूर येथील ग्रा.पं.च्या प्रांगणात जि.प.विभाग, गोंदिया व बाल विकास प्रकल्प कार्यालयद्वारे आयोजित डॉ.एपीजी अब्दुल कलाम अमृत आहार योजनेच्या उद््घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर जि.प. अध्यक्ष उषा मेंढे, महिला व बालकल्याण सभापती विमला नागपुरे, जि.प. सदस्या उषा शहारे, मुख्य कार्यपालन अधिकारी गावंडे, उपसभापती संगीता भेलावे, पं.स. सदस्य महेंद्र मेश्राम, अर्चना ताराम, खंडविकास अधिकारी मेश्राम, सहायक प्रकल्प अधिकारी विजय टेंभुर्णीकर, बालविकास प्रकल्प अधिकारी खडतरे, सरपंच रोशनी भूते, उपसरपंच राधेश्याम भोयर, विलास शिंदे, कुलदीप लांजेवार उपस्थित होते.
पुराम पुढे म्हणाले की, माझ्या जन्माचे वेळी सकस आहार मिळत नव्हते परंतु माझा क्षेत्रात ही योजना सुरू झाल्याने गर्भवती महिलांच्या पोटातून शिवाजी, बिरसाव मुंडा व बाबासाहेबांसारखे सदृढ बालक निर्माण होणार याकरिता सर्वांनी मिळून ही योजना प्रभावीपणे राबवायची आहे.प्रास्ताविक खडतरे यांनी तर संचालन नेताम व आभार रोहे यांनी मानले.