15 लाखाच्या थकबाकीसाठी ;धापेवाडा उपसा सिंचन योजनेचा विद्युत पुरवठा खंडीत

0
9

पंधराशे एकर जमीनीचे सिंचन थांबले; रब्बी पिके प्रभावित
ऊर्जामंत्र्यांनी आमदारांच्या शब्दालाही दिला फटका
गोंदिया, दि. ५ : गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याकरिता सिंचनाचा भगीरथ ठरणाèया तिरोडा तालुक्यातील धापेवाडा उपसा qसचन योजनेचा विद्युत पुरवठा महावितरणने आज शनिवारला (दि. ५) खंडीत केला. १५ लाख रुपयांची थकबाकी असल्याने महावितरणने हा निर्णय घेतला. उपसा qसचन योजनेच्या भरवशावर सुमारे पंधराशे एकरवर शेतकèयांनी रब्बी पिकांची लागवड केली. विद्युत पुरवठा खंडीत झाल्यामुळे शेतकèयांची पिके हातातून जाण्याची भिती व्यक्त होत आहे.
धापेवाडा उपसा सिंचन कार्यालयातंर्गत ही योजना वैनगंगा नदीवर कवलेवाडा गावाजवळ उभी करण्यात आली आहे.शासन सिंचन योजनेच्या वीज बिलाचे देयके भरण्यासाठी स्वतंत्र अशा कुठलाच निधी देत नाही.उलट लाभार्थी शेतकरी यांच्याकडून गोळा होणाèया पाणीपट्टीकरातूनच वीज बिलाचा भरणा करण्यात येतो.
धापेवाडा उपसा सिंचन योजनेमुळे गोंदिया आणि तिरोडा तालुक्यातील शेतीला qसचनाची सोय झाली आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्याचे बांधकाम पूर्ण झाले. त्यामाध्यमातून पंधराशे एकर जमिनीला qसचनाची सोय झाली आहे. नियमित शेतकèयांच्या जमिनीला qसचन करण्यात येत आहे. त्यामुळे एकेकाळी कोरडवाहू अशी नोंद असलेल्या तिरोडा तालुक्यातील शेतीत आज रब्बी पिके घेण्यात येत आहे. पाण्याचा उपसा करण्याकरिता महावितरणकडून विद्युत जोडणी करण्यात आली आहे. मात्र, वारंवार विद्युत थकबाकी होत असल्याने आणि स्मरणपत्र देऊन देखील बिलाचा भरणा करण्यात येत नाही. त्यामुळे महावितरणने योजनेचा विद्युत पुरवठा खंडीत करण्याचा कठोर निर्णय घेतला.
विशेष म्हणजे काही महिन्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत आमदार विजय रहागंडाले यांनी वीज बिलाचा मुद्दा उपस्थित केला होता.त्यावर मुख्यमंत्र्यांनी लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते.तर आ.रहागंडालेच्या विनंतीवर ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी पिकाच्या हंगामात वीजपुरवठा खंडीत करण्यात येणार नाही अशा शब्द दिला होता अशी माहिती विभागाच्या सूत्रांनी दिली.त्यातच धापेवाडा उपसा qसचन विभाग आणि महावितरणच्या बैठकीत सुध्दा यावर चर्चा होऊन वीज पुरवठा खंडीत न करण्यावर समंती झाली होती.तरीही आज शनिवारला महावितरणने वीज पुरवठा खंडीत केल्याने १५०० हेक्टरमध्ये लागलेले रब्बी धानाचे पीक ज्याला यावेळी पाण्याची गरज आहे,ते पीक वाया जाण्याची भिती निर्माण झाली आहे.
यासंदर्भात धापेवाडा उपसा सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता यासटवार यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी सांगितले की,वीज बिलाचा भरणा करण्यासाठी शासनाकडून कुठलाच स्वतंत्र निधी नाही.त्यामुळे आम्हाला खूप त्रास सहन करावा लागतो.शेतकèयांकडून जी पाणीपट्टी येते त्यातूनच वीज बिलाचा भरणा होतो.गेल्या एप्रिल महिन्यापासून आजपर्यंत ४५ लाख रुपयाचा भरणा पाणीपट्टीतून करण्यात आलेला आहे.१५ लाख रुपयाचा भरणा शिल्लक आहे.आधीच या तालुक्यात पिकाचे उत्पादन कमी झाले आहे.शेतकरी त्यामुळे हतबल असल्याने पाणीपट्टी वसुलीवर परिणाम होत आहे.आज महावितरणने कुठलीही विचारणा न करता आणि वीज पुरवठा खंडीत न करण्याचे तोंडी आश्वासन दिलेले असतानाही उपसा qसचन योजनेचा पुरवठा खंडीत केल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे.रब्बी पिकाचे उत्पादन आल्यानंतर शेतकरी पाणीकराचा भरणा करतील आणि आम्ही ती रक्कम जमा करू तोपर्यंत थांबा असे सांगितले होते,परंतु त्यांनी वाट न बघताच पुरवठा खंडित केल्याचे सांगितले.
शेतकèयांनी धापेवाडा उपसा qसचन योजनेच्या भरवशावर रब्बी पिकांची लागवड केली. मात्र, आता पाण्याचा पुरवठाच बंद झाल्यामुळे शेतकèयांची धाकधूक वाढली. रब्बी हंगामातील उत्पादन हातातून जाण्याची भिती शेतकèयांनी व्यक्त केली.