पालकमंत्र्यांच्या हस्ते गिधाडी येथे उपकेंद्राचे लोकार्पण 

0
10

गोरेगाव,दि. ८ : पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते नुकतेच  तालुक्यातील गिधाडी येथे नव्यानेच तयार करण्यात आलेल्या आरोग्य उपकेंद्र इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, उपाध्यक्ष रचना गहाणे, जि.प.चे आरोग्य व शिक्षण समिती सभापती पी.जी.कटरे, गोरेगाव पं.स.सभापती दिलीप चौधरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरीष कळमकर, जि.प.सदस्य विश्वजीत डोंगरे,भाजपा तालुकाअध्यक्ष नितीन कटरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मानव विकास मिशनमधून ८५ लाख रुपये खर्च करुन ही इमारत उभारण्यात आली आहे. सदर आरोग्य उपकेंद्र हे चोपा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येत असल्यामुळे गिधाडी परिसरातील गावातील नागरिकांनी आरोग्याची चांगली सुविधा या उपकेंद्राच्या इमारतीमुळे मिळण्यास मदत होणार आहे.