ओबीसी मुद्यावर आक्रमक होण्याची गरज आ.वड्डेटीवार

0
8

गोंदिया : ओबीसींच्या विविध प्रलंबित समस्यांवर चर्चा करण्यासाठी जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समतीच्या शिष्टमंडळाने रविवारी विधानसभेतील काँग्रेसचे उपगटनेते आमदार विजय वड्डेटीवार यांची भेट घेऊन चर्चा केली. दरम्यान आ.वड्डेटीवार यांना विविध समस्यांचा उल्लेख असलेले निवेदन सादर करण्यात आले.
यादरम्यान आमदार वड्डेट्टीवार यांनी ओबीसी समाजाकडे आमच्या पक्षाने केलेल्या चुकांचे परिणाम तर निवडणुकीत भोगावेच लागले.परंतु जो पक्ष गेली १५ वर्ष विरोधी पक्षात असताना आम्हीच ओबीसींचे खरे हितqचतक म्हणून आवाज उठवायचा आज त्यांचंीच सरकार असताना ओबीसी विद्याथ्र्याला महाराष्ट्रात शिष्यवृत्ती न मिळाल्याने आत्महत्या करण्याची वेळ आली ही खरी फडणवीस सरकारची नामुष्की असल्याचे ओबीसी कृषी संघर्ष समितीच्या शिष्यमंडळासोबत चर्चेदरम्यान सांगितले.आपण या अधिवेशनात लोकेशच्या प्रकरणासह राज्यात लाखोंच्या संख्येत सुरू शैक्षणिक सत्रातील विद्याथ्र्यांची शिष्यवृत्ती सरकारने थांबवून ठेवली आहे,त्यावर सरकारचे लक्ष वेधणार असून गोंदिया जिल्ह्यात ओबीसी संघर्ष कृती समितीच्या कुठल्याही कार्यक्रमाला हजर राहण्याची तयारी त्यांनी दर्शवीत आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले.यावेळी तेली महासंघाचे अध्यक्ष आनंदराव कृपाण,ओबीसी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष बबलू कटरे,कार्याध्यक्ष अमर वराडे, महासचिव खेमेंद्र कटरे,आशिष नागपूरे,, कैलास भेलावे उपस्थित होते.