प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी न केल्याने काँग्रेससमर्थित पॅनल निवडणुकीतून बाद

0
8

गोंदिया-येथील सेंट्रल कृषक सहकारी संस्थेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेससमर्थित पॅनलच्यावतीने नोंदविण्यात आलेल्या आक्षेपामुळे काँग्रेस समर्थीत पॅनलच्या १३ ही उमेदवारांचे उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी यांनी रद्द केले.सदर उमेदवारांनी अर्ज सादर करतेवेळी सादर करावयाच्या प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी न केल्याने त्यांचे अर्ज राष्ट्रवादीचे जितेश टेंभरे यांच्या आक्षेपावरून रद्द ठरविण्यात आले.त्यामध्ये शिवलाल पटले,विनोद बिसेन,नरोत्तम बघेले,भीकाजी चव्हाण,सुकचरण हिरापुरे,मंगल ठाकरे,नोहरलाल वहेटवार,उमेदलाल रहागंडाले,पुस्तकलाबाई बघेले,निधी ठाकरे,भदू मेश्राम,व्यकंटराव मेश्राम आणि राजेश ठाकरे या उमेदवारांचा समावेश आहे.त्यामुळे सेंट्रल कृषकच्या निवडणुकीत आता भाजप व राष्ट्रवादी काँग्रेससमर्थित पॅनलमध्ये निवडणूक रंगणार असली तरी काँग्रेस आपला वचपा काढण्यासाठी भाजपच्या पॅनलला सहकार्य करण्याची शक्यता नाकारता येत नाही.