गोंदिया जिल्हयाची खरीप पिकांची अंतिम पैसेवारी सरासरी 89 पैसे तर वाशिम जिल्ह्याची ४७ पैसे

0
16

गोंदिया/वाशिम, दि. 31 : सन २०२२-२३ च्या खरीप हंगामातील प्रमुख पिकांची गोंदिया जिल्ह्याची सरासरी हंगामी पैसेवारी 89 पैसे तर वाशिम जिल्ह्याची सरासरी हंगामी पैसेवारी ४७ पैसे इतकी जाहीर करण्यात आली आहे. गोंदिया जिल्ह्यात 955 महसूली गावे असून 919 गावात पीक लागवड करण्यात आली.तर 36 गावात पीक लागवड झालेली नाही. 6 गावांची पैसेवारी 50 पैशाच्या आत तर 913 गावांची पैसेवारी ही 50 पैशाच्यावर आहे.त्याचप्रमाणे वाशिम जिल्ह्यात एकूण ७९३ महसूल गावे आहेत. यातील सर्वच ७९३ गावांची खरीप हंगामाची नजर अंदाज पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे. गोदिया जिल्ह्यातील गोंदिया तालुक्याची पैसेवारी 87 पैसे,गोरेगाव तालुका 94 पैसे,तिरोडा 78 पैसे,अर्जुनी मोर 88 पैसे,देवरी तालुका 1.03 पैसे,आमगाव तालुका 88 पैसे,सालेकसा तालुका 85 पैसे व सडक अर्जुनी तालुक्याची अंतिम पैसेवारी 88 पैसे अशी जिल्ह्याची पैसेवारी 89 पैसे काढण्यात आली आहे.

          वाशिम तालुक्यात एकूण १३१ महसुली गावे आहेत.या सर्व १३१ गावांची पैसेवारी ४७ पैसे इतकी आहे. मालेगाव तालुक्यातील १२२ गावे आहे, या १२२ गावांची पैसेवारी ४७ पैसे आहे.रिसोड तालुक्यात १०० महसूली गावे असून या सर्व १०० गावांची हंगामी पैसेवारी ४६ पैसे आहे. मंगरुळपीर तालुक्यात १३७ महसूल गावे असून या सर्व गावांची पैसेवारी ४७ पैसे आहे. कारंजा तालुक्यात एकूण १६७ महसूली गावांची पैसेवारी ४७ पैसे आणि मानोरा तालुक्यातील सर्व १३६ गावांची पैसेवारी ४७ पैसे आहे.जिल्ह्यातील खरीप हंगामातील अंतिम पैसेवारी सरासरी ४७ पैसे इतकी आढळून आली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.