सुरतोली ग्रा.पं.कार्यालय कचर्‍याच्या विळख्यात

0
16

देवरी- स्वच्छ भारत मिशन राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना स्वच्छता राखण्याचे संदेशही स्थानिक स्वराज्य संस्थांकडून दिले जाते. मात्र दिव्याखाली अंधार या म्हणी प्रमाणे तालुक्यातील सुरतोली येथील ग्रामपंचायत कार्यालय परिचिती देत आहे. सुरतोली ग्रा.पं. कार्यालयाचे प्रांगणात कचर्‍याचे साम्राज्य उघडपणे पहावयास येत आहे. यामुळे ग्रा.पं. कार्यालयच कचर्‍याच्या विळख्यात तर गाव स्वच्छतेची अपेक्षा कशी करावी, असा प्रश्न गावकर्‍यांकडून उपस्थित केला जात आहे.
गाव स्वच्छ व सुंदर रहावे, या अनुषंगाने राज्य व केंद्र शासनाकडून विविध उपक्रम व अभियान राबविण्यात येत आहे. स्वच्छता संदभार्तील उपक्रमाची अंमलबजावणीही स्थानिक स्वराज्य संस्थांकडून केली जाते. एवढेच नव्हेतर नागरिकांनाही स्वच्छतेचे संदेश शासन -प्रशासनाकडून दिले जाते. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांचेच कार्यालय अस्वच्छतेच्या साम्राज्यात असतील तर नागरिकांना स्वच्छतेचा संदेश कसा देता येईल, असा प्रश्न सुरतोली ग्रामपंचायती प्रांगण उघडपणे उपस्थितपणे करून देत आहे. सुरतोली ग्रामपंचायतचे कार्यालय गावातील मुख्य मार्गावर आहे. त्त्याच प्रमाणे कार्यालयाचे शेजारीच अंगणवाडीची इमारत आहे. मात्र या कार्यालयात केरकचर्‍यातून ये-जा करावी लागते. कार्यालयाचे प्रांगणात केरकचर्‍याचे साम्राज्य आहे. मोठ्या प्रमाणात केरकचरा असल्यामुळे सरपटणार्‍या प्राण्यांपासून धोका निर्माण होऊ शकतो. हा सर्व प्रकार उघडपणे पहावयास येत असला तरी ग्रा.पं. प्रशासन याकडे डोळेझाक का करीत आहे, असा प्रश्न गावकर्‍यांकडून उपस्थित केला जात आहे.