गोंदिया पालिकेच्या सभापतीपदावर भाजप सेनेचे वर्चस्व

0
14

गोंदिया, दि.११ : गोंदिया नगर पालिकेच्या विषय समिती सभापतींची निवडणूक आज, शुक्रवारी पार पडली. या आधी अध्यक्ष, उपाध्यक्ष भाजपचे होते. परंतु, विषय समित्या काँग्रेसकडे असल्यामुळे विकासकामे अडकल्याचा आरोप काँग्रेस आणि भाजप एकमेकांवर करत होते. मात्र, आज पार पडलेल्या निवडणुकीत भाजपकडे तीन विषय समित्या आल्याने भाजपची सत्ता खèया अर्थाने प्रस्थापित झाली. बांधकाम,पाणी पुरवठा, नगर रचना या समित्या भाजपकडे, तर शिक्षण समिती काँग्रेस आणि महिला व बालकल्याण समिती शिवसेनेच्या हाती आली.
नगर पालिकेत काँग्रेसचे सहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे ११, शिवसेनेचे ३, अपक्ष दोन सदस्यसंख्या आहे. एकूण ४० नगरसेवक असलेल्या पालिकेतील एक सदस्यपद रिक्त आहे. पालिकेत अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद भाजपकडे आहे.  आज, शुक्रवारी विषय समिती सभापतींची निवडणूक घेण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी के.एन.के राव आणि पालिकेचे मुख्याधिकारी वाहूरवाघ यांनी काम पाहिले. भाजपच्या वतीने बांधकाम सभापती पदाकरिता जितेंद्र(बंटी) पंचबुद्धे, पाणी पुरवठा सभापतीपदाकरिता श्रद्धा नाखले, नगररचना समितीकरिता शोभा चौधरी यांनी अर्ज दाखल केले. विरोधी पक्षाच्या वतीने बांधकाम समितीकरिता मनोहर वालदे, शिक्षण समिती करिता शीला इटानकर, पाणी पुरवठा समितीकरिता आशा पाटील, नियोजन समितीकरिता अनिता बैरीसाल, महिला बालकल्याण समितीकरिता ममता बन्सोड यांनी अर्ज दाखल केले. मात्र, सदस्यसंख्येच्या बळावर झालेल्या निवडणुकीत भाजपच्या सोबतीला शिवसेना आणि दोन अपक्ष सदस्यांनी भाजप आणि सेनेच्या उ‘ेदवारांना ‘तदान केले. त्या‘ुळे तीन विषय स‘ित्या भाजपच्या, तर प्रत्येकी एक पद काँग्रेस आणि शिवसेनेकडे गेले. सार्वजनिक बांधकाम समिती अध्यक्षपदी भाजपचे जितेंद्र(बंटी) पंचबुद्धे, पाणी पुरवठा व जलनिःसारण समिती सभापतिपदी श्रद्धा नाखले, नियोजन व विकास समितीवर शोभा चौधरी, शिक्षण समितीवर काँग्रेसच्या शीला ईटानकर आणि महिला व बालकल्याण समिती सभापतीपदाकरिता शिवसेनेच्या लता रहांगडाले यांची निवड करण्यात आली.