ककोडी येथे शेतकरी प्रशिक्षण शिबिर

0
6

गोंदिया-(दि.11)महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन देवरी तालुक्यातील ककोडी येथे गेल्या बुधवारी (ता.9) करण्यात आले होते.

शिबिराचे अध्यक्षस्थानी मनोज मेश्राम हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्य गणेश सोनबोईर तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, मंडल कृषी अधिकारी प्रकाश मेश्राम, एम जी तलमले आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक सपना लांडगे यांनी केले.

यावेळी बोलताना श्री कोटांगले म्हणाले की, महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत योग्य व्यवसायाची निवड करून प्रकल्प यशस्वीरीत्या राबविण्याचे आवाहन उपस्थित शेतकऱ्यांना केले. ककोडी परिसरातील कोरडवाहू क्षेत्राचे नियोजन करून  फळपिकांची लागवड करण्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी सुद्धा समयोचित मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे संचालन मनेंद्र मोहबंशी यांनी केले, उपस्थितांचे आभार आर टी शेंडे यांनी मानले. यावेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते,