रावणवाडी येथे कार्यक्रम जागतिक ग्राहक दिन

0
6

गोंदिया,दि.१४ : जागतिक ग्राहक दिनाचे औचित्य साधून १५ मार्च रोजी दुर्गा माता मंदिर परिसर रावणवाडी येथे जागतिक ग्राहक दिन कार्यक्रमाचे आयोजन दुपारी १२ वाजता करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी हे करतील. यावेळी विविध शासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी, ग्राहक संघटनांचे पदाधिकारी तसेच ग्राहक बंधू भगीनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी श्री.सवाई यांनी केले आहे.