१९ मार्चला कटंगीकला येथे जिल्हास्तरीय स्वच्छ भारत मिशन कार्यशाळा

0
5

पोपटराव पवार करणार मार्गदर्शन
गोंदिया,दि.१४ : ग्रामीण विकासाच्या योजनांची माहिती गावाच्या विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्रामस्थांना व्हावे त्याचसोबत स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासोबतच शौचालयाचा नियमीत वापर करण्यासाठी ग्रामस्थांना प्रवृत्त करण्यासाठी १९ मार्च रोजी सकाळी वाजता कटंगीकला येथील मयुर लॉन येथे जिल्हास्तरीय सरपंच मेळावा व स्वच्छ भारत मिशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उदघाटन पालकमंत्री राजकुमार बडोले हे करतील. अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्षा उषा मेंढे हया असतील. यावेळी खा.प्रफुल पटेल, खा.नाना पटोले, खा.अशोक नेते, आमदार सर्वश्री राजेंद्र जैन, ना.गो.गाणार, प्रा.अनिल सोले, गोपालदास अग्रवाल, विजय रहांगडाले, संजय पुराम, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, जि.प.शिक्षण व आरोग्य समिती सभापती पी.जी.कटरे, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती छाया दसरे, महिला व बालकल्याण समिती सभापती विमल नागपूरे, समाजकल्याण समिती सभापती देवराज वडगाये, कटंगीकलाच्या सरपंच कांता नागरीकर, प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार पुराम यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
राज्यात आपल्या गावाचा कायापालट करुन राज्यातच नव्हे तर देशात हिवरे बाजार या गावाचे नावलौकीक करणारे माजी सरपंच तथा राज्यस्तरीय आदर्श गाव समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार हे आमचा गाव आमचा विकास या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून या कार्यक्रमात मार्गदर्शन करणार आहे. त्यांच्या या मार्गदर्शनामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण विकासाला निश्चितच गती मिळणार आहे.
या कार्यक्रमात उत्कृष्ट काम केलेले सरपंच तसेच आदर्श ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांचा सत्कार, इंदिरा आवास योजना व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या योजना या विषयावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश देशमुख, सरपंच व ग्रामसेवक यांचे कर्तव्य या विषयावर या विषया उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बागडे, मनरेगा मजूर व गावाचा विकास या विषयावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेश भांडारकर, संपूर्ण स्वच्छता व गावाचा विकास या विषयावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश देशमुख, १४ वा वित्त आयोग निधी व खर्च या विषयावर गटविकास अधिकारी नारायण जमईवार, ग्रामीण भागामध्ये पाणीपुरवठा या विषयावर कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणीपुरवठा) एस.आर.शर्मा हे मार्गदर्शन करणार आहे. जिल्ह्यातील सर्व जि.प.सदस्य, पं.स,सदस्य, सरपंच, उपसरपंच यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे यांनी केले आहे.